नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दि २६ मार्च , मंगळवारी आरोग्य व दंत शिबिराचे आयोजन,गरजुंनी लाभ घेण्याचे आवाहन

नवापूर सत्यप्रकाश न्युज
      येथील तालुक्यातील व परिसरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, दिनांक २६/०३/२०१४ वार - मंगळवार सकाळी १०.वा आपल्या सर्वांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे तज्ञ डॉक्टरांमार्फत सर्वरोग निदान शिबीर आयोजीत करण्यात आलेले आहे. सदर शिबिर खालील तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत राहणार असून रूग्ण तपासणी करणार आहेत. 
   यात सर्जन डॉ. उमेश जाधव,मानसोपचार तज्ञ डॉ. अतुल वळवी, स्त्रीरोग तज्ञ डॉ. संतोष परमार,फिजीशियन डॉ. प्रविण बागुल, दंतरोग तज्ञ डॉ. स्मिता कटारिया,
 बालरोग तज्ञ डॉ. कुंदन बेंद्रे, नेन्नरोग तज्ञ डॉ. दिनेश पाटील, त्वचारोग तज्ञ डॉ.सानिका पाटील, आयुष तज्ञ डॉ. दुर्गेश शहा,कान नाक घसा तज्ञ डॉ. जटाल,
अस्थिरोग तज्ञ डॉ. बस्सी,आयुष तज्ञ डॉ. कविता बेहरे आदिंचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी या शिबिरास  सहभागी होण्याचे आवाहन डॉ. कपिल आहेर उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ नाशिक,डॉ. वर्षा लहाडे जिल्हाशल्यचिकित्सक, नंदुरबार,डॉ. सुलोचना बागुल,निवासी वैद्यकिय अधिकारी, नंदुरबार,डॉ. रविंद्र सोनवणे,जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार डॉ. संदीप पुंड अति जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार,
डॉ.अनिल गावीत वैद्यकिय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, नवापूर डॉ मनिषा वळवी नवापूर,तालुका वैद्यकिय अधिकारी, नवापूर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post