येथील दि नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित दि एन. डी. अँड एम.वाय.सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे. शाह कनिष्ठ महाविद्यालय,नवापूर येथे दिनांक 26/0 8 /2024 रोजी पहिल्यांदा श्रीकृष्ण जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात संस्थेचे निमंत्रित सदस्य माननीय श्री कल्पेशकुमार चंद्रवदन जोशी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते ,तसेच संस्थेचे सदस्य माननीय श्री मोहम्मदजी कासिमभाई मुल्ला कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व श्रीकृष्ण प्रतिमा पूजनाने व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.तद्नंतर विद्यार्थ्यांनी कृष्णजन्मोत्सवावर आधारित संगीत नाटक सादर केले, तसेच जन्माष्टमी वर आधारित विविध नृत्य विद्यार्थ्यांद्वारे सादर करण्यात आले.शाळेचे माननीय प्राचार्य श्री संजयकुमार जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण यांच्या उपदेशावर आधारित डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री कल्पेशकुमार चंद्रवदन जोशी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून रोख रक्कमेचे बक्षीस दिले. प्रस्तुत कार्यक्रम शाळेचे प्राचार्य माननीय श्री संजयकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाने यशस्वीरित्या पार पडला.कार्यक्रमाला शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परिख तथा शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्याकरिता शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती निर्जला सोनवणे, श्रीमती चंद्रकला जाधव, श्रीमती यास्मिन फकीर यांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमती यास्मिन फकीर यांनी केली. कार्यक्रमाचे आभार श्रीमती चंद्रकला जाधव यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती निर्जला सोनवणे यांनी केले.
Tags:
शैक्षणिक