आज दिनांक 02.01.2025 रोजी "आझाद दस्ता क्रांतीवीर" स्मारक समिती वांगणी ता. अंबरनाथ यांनी वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील व भाई कोतवाल यांच्या "हुतात्मा स्मृतिदिनानिमित्ताने" कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा सन्मान सोहळा आयोजित करून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला, सर्वांना हवाहवासा असणारा, अल्पावधीतच सर्वांच्या मनामध्ये घर करणारा, सर्वांच्या मदतीला धावून जाणारा, हक्काचा आमदार जो "विद्यार्थी व शिक्षकांची प्रामाणिकपणे सेवा करीत आहे ", सामाजिक, शैक्षणिक कार्यासाठी विधिमंडळात सतत प्रश्न उपस्थित करून, सरकार दरबारी पाठपुरावा करून अनेकांना न्याय मिळवून दिला, त्याबद्दल तसेच महाराष्ट्र शासनाकडून औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ, या संस्थेला "वीर हुतात्मा हिरजी गोमाजी पाटील" नाव देउन वीर हुतात्म्यांचे इतिहास नवीन पिढीसाठी जागृत केला, त्याचबरोबर बदलापूर येथील वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चौकाचे सुशोभीकरण केल्याबद्दल आझादस्त स्मारक समितीच्या वतीने "सन्मानपत्र" देऊन सन्मान केला .*
*आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की हिराजी गोमाजी व पाटील व भाई कोतवाल यांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कळवा म्हणून शालेय अभ्यासक्रमामध्ये क्रांतिवीर हिराजी गोमाजी पाटील व भाई कोतवालांचा धडा पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच ठाणे रायगड पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये हिराजी गोमाजी पाटील व भाई कोतवाल यांचे तैलचित्र व त्यांच्या शौर्यगाथांची माहितीचे पुस्तक देऊन त्यांच्या कार्याची महती पोहोचवण्याचे कार्य करू
Tags:
शैक्षणिक