नवापुरात साथीचे आजार जोरात, दवाखान्यात गर्दि

      नवापूर सत्यप्रकाश न्युज
   शहरात गेल्या काही दिवसांपासून संततधार व मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. यामुळे वातावरणामध्ये मोठे बदल झाले असून, पावसामुळे निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे साथीचे आजार डोके वर काढत आहेत. सध्या शहरात जवळजवळ प्रत्येक घरात एखादा तरी रुग्ण आजारी असल्याचे चित्र दिसत असून दवाखाने अक्षरशः हाऊसफुल झाले आहेत.
    शहरातील सरकारी रुग्णालय तसेच खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी झाली आहे. विशेषतः मलेरिया, टायफॉईड, निमोनिया, खोकला, सर्दी आणि ताप यांसारखे आजार वेगाने पसरत आहेत. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील नागरिक या आजारांच्या विळख्यात अडकत आहेत. अनेक कुटुंबे | संपूर्णपणे आजारी पडल्याचे चित्र समोर येत आहे. काही गंभीर रुग्णांना तर उपचारासाठी गुजरातमधील सोनगढ, व्यारा येथील रुग्णालयांमध्ये हलविण्याची वेळ आल्याचे समजते.
 दरम्यान, पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पाण्याचे डबके, तुंबलेले नाले आणि गल्लीबोळातील अस्वच्छता यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून मलेरियाचा धोका आणखीन गंभीर होत आहे.
   ले

आरोग्य तज्ज्ञांनी मात्र नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. स्वच्छ पाणी पिणे, उकळून पाणी वापरणे, घाण पाण्यात पाय न टाकणे, घर व परिसर स्वच्छ ठेवणे, डास चावू नयेत म्हणून मच्छरदाणीचा वापर करणे आणि लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  दरम्यान, सतत वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाचीही धावपळ सुरू झाली आहे. डॉक्टर व आरोग्य कर्मचारी + कमी पडत असून, औषधांचा पुरवठा अपुरा असल्याची चर्चा रुग्णांमध्ये सुरू आहे. योग्यवेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना न झाल्यास परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची भीती.
    पालिकेने ठिकठिकाणी औषधं फवारणी करण्याची मागणी जोर धरत असुन यथायोग्य मार्ग पालिकेचा आरोग्य विभाग काढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ज्यामुळे आजारावर मात करता येईल व पुन्हा जनजीवन सुरळीत होईल. पालिका मुख्याधिकारी स्वतः डॉक्टर असल्यामुळे ते नेहमीच सतर्क असतात म्हणूनच भर पावसात स्वतः च्या आरोग्याची परवा न करता भरपावसात नागरिकांचा मदतीला धावुन गेले व नागरिकांना शक्य तेवढी मदत केली आता पाउस थांबणे गरजेचे असुन पाउस थांबण्याची देखील प्रतिक्षा होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post