नंदुरबार पश्चिम रेल्वेच्या मुंबई मंडळाकडून मुंबई सेंट्रल ते नंदुरबार ही नवीन एक्सप्रेस रेल्वेगाडी ७ जूनपासून धावणार आहे. ही गाडी दररोज धावणार असून १९४२५ आणि १९४२६ असे तिचे क्रमांक आहे.
दररोज मुंबई सेंट्रल येथून रात्री १० वाजून पाच मिनिटांनी ही गाडी निघणार आहे. त्याचप्रमाणे दररोज दुपारी २ वाजेच्या सुमारास ही गाडी नंदुरबारहून मुंबई सेंट्रलकडे धावेल,
दादर, बोरिवली, वसई रोड, पालघर, डहाणू रोड, उमरगाम रोड वापी, वलसाड, बिलीमोरा जंक्शन, नवसारी, चलठाण, बारडोली, उकाई सोनगड, नवापूर या मार्गाने ही गाडी नंदुरबारकडे येणार आहे.
कोरोनाच्या काळात बंद असलेली रात्रीची नंदुरबार सुरत ही पॅसेंजर गाडीही ८ जूनपासून सुरू होणार आहे. ही गाडी दररोज सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी नंदुरबार येथे पोहोचणार आहे. सुरत मार्गावर मेमो ट्रेनसोबत आणखी एक पॅसेंजर व मुंबईपर्यंत एक्सप्रेस गाडी सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी वळणार आहे.
परिसरातील खा.डाॅ.हिना गावीत यांच्या प्रयत्नांना यश आले असून या रेल्वे गाड्य
या गाड्या सुरू झाल्याने रेल्वे यात्रेकरूंमध्ये आनंद व्यक्त केला जात असून आभार मानले जात आहे.
दरम्यान आता मुंबई प्रवास सोयीस्कर होणार आहे.याच प्रमाणे खान्देश एक्स्प्रेस (भुसावळ- बांद्रा) व सूरत अमरावती फास्ट पॅसेंजर या गाड्या देखील नियमित करण्याची मागणी परिसरातील रेल्वे प्रवाश्यांकडून करण्यात येत आहे.