गणेश मंडळांनी नियमांचे पालन करावे -पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील

.     नवापूर सत्यप्रकाश न्युज 
    आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवापूर शहरात सुरक्षितता आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस विभाग सज्ज झाला आहे. याच अनुषंगाने नवापूर पोलीस ठाण्यात शहरातील सर्व गणेश मंडळांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.
  या बैठकीत प्रत्येक मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. गर्दीच्या नियंत्रणासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. डीजे आणि ध्वनीवर्धक उपकरणांचा वापर ठरवलेल्या मर्यादित डेसिबलमध्येच करावा. विसर्जन मिरवणूक वेळ, मार्ग आणि नियमानुसारच पार पाडावी. जिल्हाधिकारी यांच्या नियमानुसार लवकरच अधिकृत सूचना सर्व गणेश मंडळांना लेखी स्वरूपात दिल्या जातील, असेही निरीक्षक पाटील यांनी सांगितले.
या बैठकीस शहरातील प्रमुख गणेश मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्ते आणि पोलिस दलाचे अधिकारी उपस्थित होते.
  गणेशोत्सव हा श्रद्धा आणि एकात्मतेचा उत्सव आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करून शांततेत उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने यावेळी केले. शिस्तबद्ध आणि सुरक्षित गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार यावेळी सहभागींनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post