सार्वजनिक मराठी हायस्कूल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.....

       नवापूर - सत्यप्रकाश न्युज 
    येथील श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए.एम. व्होरा कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
         या महान व्यक्तींचा कार्याला उजाळा देण्यासाठी शाळेत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नववी व दहावीच्या 21विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मिलिंद वाघ होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक नारायण मराठे,  पर्यवेक्षक दीपक मंडलिक, डॉ. गणेश महाजन, कनिष्ठ महाविद्यालय  विभाग प्रमुख श्रीमती मेघा पाटील,तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री भरत सैंदाणे ,श्री दर्शन अग्रवाल ,श्री नरेश जयस्वाल ,श्रीमती योगिता पाटील व इतर सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
            कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचा हस्ते लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.उपमुख्याध्यापक श्री नारायण मराठे सरांनी प्रस्तावनेत विद्यार्थ्यांना वेळेचे महत्व पटवून दिले व आलेल्या संधीचे सोने करण्यास आव्हान केले. स्पर्धकांना शैक्षणिक साहित्य, प्रशस्ती पत्र देवून गौरविण्यात आले.  प्रथम क्रमांक जागृती विलास गावित, द्वितीय क्रमांक मोनाली प्रकाश गावित,तृतीय क्रमांक सुफियन सहीद खाटीक तसेच उत्तेजनार्थ बक्षीस पल्लवी धर्मेंद्र गावित व मनस्वी संदीप पाटील यांनी मिळविला
               आपल्या अध्यक्षीय भाषणातूनश्री  मिलिंद वाघसर  यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच सर्वच महापुरुषांचे कार्य लक्षात ठेवावे असे आव्हान विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता श्री भरत सैंदाणे सरांनी वीर सावरकरांच्या उदाहरणातून देशप्रेम कसे असावे ते समजावले .या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून श्रीमती योगिता पाटील, श्रीमती मंजुषा वसावे व श्री कर्नल वसावे  यांनी काम पाहिले.
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कल्पेश पाटील सर यांनी केले तर आभार श्री कमलेश पाटील यांनी मानले
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री एम.एस. वाघ यांच्या  मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

Previous Post Next Post