गुजरात राज्यातील शिंपी बांधव यांना बक्षिपंच म्हणजे ओबीसी मध्ये सामील करण्यासाठी बर्याच वर्षांपासून समाज बांधव कार्यरत आहेत. त्याच कार्यक्रमाचा पुढचा टप्पा म्हणुन ता. 31/07/2025. रोजी अखिल गुजरात शिंपी समाजाचे अध्यक्ष श्री कमलाकर अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली सुरत, अहमदाबाद,बरोडा, नवसारी,अहवाडांग , भरुच अंकलेश्वर येथुन लगबग 30 समाज बांधव गांधीनगर बक्षिपंच यांच्या कार्यालयावर जाऊन श्री मेहता साहेब यांची औपचारिक भेट घेतली व शिंपी समाज हा गुजराती दर्जी समाज समान आहे, आम्हाला जर बक्षिपंच मध्ये घेतले तर आमच्या मुलामुलींना त्याचा असा फायदा होईल हे समजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.त्यावर साहेबांचा खुपच पोजीटिव उत्तर कमिटिला मिळाले. लवकरात लवकर गुजरात राज्यातील ओबीसी आरक्षण आपणास मिळेल या आशेने कमिटी कार्य करीत आहे. सुरत, अहमदाबाद,बरोडा, नवसारी,भरुच अंकलेश्वर,आहवाडांग येथुन आलेल्या सर्व समाज बांधवांचे मा.अध्यक्ष यांनी आभार प्रदर्शन केले.
Tags:
सामाजिक