मुळचे गोराणे (ता. शिंदखेडा) येथील रहिवासी आणि नवापूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दिगंबर पाठक दि. ३१ जुलै रोजी जिल्हा पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले.
३४ वर्षे सेवा झाल्यानंतर नियत वयोमानानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाठक सेवानिवृत्त झाले. श्री. पाठक यांनी पोलीस सेवेचा प्रारंभ नाशिक शहर आयुक्तालय, कुंभमेळा, धुळे जिल्हा आणि आता नंदुरबार जिल्ह्यात २४ वर्षे सेवा झाली. गेल्या ५० वर्षापासून ते कुटुंबासह नवापूर येथे स्थायिक झाले आहेत.
अत्यंत मनमिळाऊ व सीधे साध्या स्वभावाचे प्रमोद पाठक हे सध्या नवापूर येथील शास्त्रीनगर भागात वास्तव्यास असुन ते बाबा पाठक म्हणून परिसरात प्रसिद्ध आहेत त्यांच्या पिताश्रींनी देखील पोलिस दलात कित्येक वर्षे सेवा दिली ते देखील तसेच ज्येष्ठ बंधू भटुभाउ पाठक यांनी देखील आपल्या सेवा तनमनाने केली अत्यंत साधे व सरळ स्वभावाचे प्रमोद पाठक हे धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असुन काही दिवसांपूर्वी त्यांनी भागवत कथेचे आयोजन करुन परिसरातील नागरिकांना भागवतचा लाभ प्राप्त करून दिला.
अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे प्रमोद पाठक यांना त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल परिसरातील नागरिकांकडून शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्राप्त होत आहे .
Tags:
सामाजिक