दि नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित दि एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे. शाह कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर येथे जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी करिअर, स्किल डेव्हलपमेंट गायडन्स आणि कौन्सिलिंग प्रोग्रामचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भविष्यकालीन वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या विशेष कार्यक्रमाला दि नवापूर एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष आणि रेंटीओ फुड प्रा. लि. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीमती शीतल बेन वाणी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य श्री हेमंतभाई शहा देखील उपस्थित होते. व्यासपीठावर शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परीख, उपप्राचार्य श्री नरेंद्र पाटील सर आणि पर्यवेक्षिका श्रीमती निर्जलाबेन सोनवणे यांचीही उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला अकरावी आणि बारावी कॉमर्सचे एकूण ८८ विद्यार्थी उपस्थित होते. सोबतच शाळेचे उपशिक्षक श्री पी.व्ही. पाटील सर, श्रीमती मीनाक्षी वळवी मॅडम आणि एजाज रंगुनवाला सर हे देखील विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले सुंदर कार्ड्स आणि फुले देऊन प्रमुख पाहुण्या श्रीमती शीतलबेन वाणी यांचा सत्कार केला. त्यानंतर प्रमुख पाहुण्या श्रीमती शीतल बेन वाणी यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी आर्थिक नियोजनाचे महत्त्व (Importance of Financial Planning), कौशल्य विकासाची आवश्यकता (Skill Development is Necessary), आधुनिक युगाची मागणी म्हणून परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता (Adaptability is the Demand of Modern Era), नेहमी नवीन गोष्टी शिकत राहणे (Always Learn New Things), अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रमांमध्ये सहभाग (Part in Extra-Curricular Activities), वेळेनुसार बदलणे शिकणे (समय के साथ चलना सीखो), आव्हाने स्वीकारणे (Accept Challenges) आणि अपयशाला घाबरू नका (Don't Fear with Failures) या विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
त्यानंतर संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य श्री हेमंतभाई शहा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात काय करायचे आहे याचा अगोदरच विचार करून उत्तर शोधणे (Find the Answer in Advance What You Will Want to Do in Future), आपले ध्येय आणि करिअरची काळजीपूर्वक निवड करणे (Always Carefully Select Your Goal and Career) आणि मूलभूत संबंधित माहिती (Basic Related Information) यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात शाळेचा विद्यार्थी हर्ष चावला याची राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्या श्रीमती शीतल बेन वाणी यांनी पुष्पगुच्छ देऊन हर्षचा सत्कार केला आणि त्याला राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती डॉक्टर कामिनी बेरी यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक प्रेरणादायी ठरला. सदर संपूर्ण कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री संजयकुमार जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
Tags:
शैक्षणिक