30 जुलैला होणार जप्त वाहनांचा लिलाव - दत्तात्रय जाधव

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
    तालुक्यातील अनाधिकृत गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक करताना पकडलेल्या जीजे-16-डब्ल्यु-0086 या वाहनाचा लिलाव 30 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजता तहसिल कार्यालय, नवापूर येथे होणार असल्याचे नवापूरचे तहसिलदार दत्तात्रय जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. हे वाहन अनाधिकृत गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक करताना आढळून आले होते. त्यानंतर हे वाहन जप्त करून तहसिल कार्यालय, नवापूर येथे लावण्यात आले आहे. वाहन मालकाला या प्रकरणी दंडात्मक नोटीस आणि आदेश देण्यात आले होते, परंतु त्यांनी अद्याप दंडाची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 176 ते 184 मधील तरतुदींनुसार, जप्त केलेल्या वाहनाला जमीन महसुलाची थकबाकी समजून लिलाव करून त्यातून मिळणारा महसूल शासनाकडे जमा करणे आवश्यक आहे. तहसिल कार्यालयाकडील नमुना क्रमांक 3 नुसार नमूद केलेली जंगम मालमत्ता (वाहन) अटकावून ठेवण्यात आली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार यांच्याकडून वाहनाचे मूल्यांकन प्राप्त झाले आहे. नवापूर तालुक्यातील लिलावात सर्व इच्छूक नागरिकांनी तहसिल कार्यालय, नवापूर येथे उपस्थित रहावे असेही आवाहन नवापूर तहसिलदार जाधव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post