बडौदा शिंपी समाजाच्या मान्यवरांनी घेतली गुजरात विधानसभेचे माजी अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांची भेट

.       बडोदे सत्यप्रकाश न्युज 
     येथील समाजाचे राजकीय सल्लागार श्री महेश गवांदे यांचा प्रयत्नाने आज तारीख ३ ऑगस्ट २०२५ रोज दुपारी १ वाजता माननीय श्री राजेंद्र त्रिवेदी,पूर्व विधानसभा अध्यक्ष आणि पुर्व कॅबिनेट मंत्री यांचा बडोदे स्थित कार्यालय वर त्यांची विशेष मुलाकात घेतली.
तेव्हा बडोदे शिंपी समाजाचे प्रमुख सल्लागार श्री लक्ष्मणराव आहिरे, श्री मदन शिंपी,अध्यक्ष श्री चंद्रकांत मांडगे,गुजरात समाज अध्यक्ष श्री कमलेश आहिरे,आणि अन्य पदाधिकारी सर्व श्री अशोक पवार,गौतम मांडगे,भास्कर जगताप,अतुल सोनवणे,रविंद्र चित्ते,शिरीष बिरारी,महेश गवांदे,श्रीकांत जगताप,संजय भांडारकर,कपिल जगताप,कमलेश जगदाळे,प्रशांत गाटे, हनुमान गाटे,धर्मेश गाटे,श्री गाटे आणि कृष्णा गाटे,विशाल मिळुन सर्व २२ सदस्य हाजर होते.
श्री राजेंद्र त्रिवेदी यांचे श्री मदन शिंपी यांचा हस्ते शौल आणि गुलदस्ता देऊन त्यांचे अभिवादन केले आणि ओबीसी साठी चा प्रयत्न साठी ची पुर्व भुमिके शी त्यांना अवगत करविले आणि लवकरात लवकर ह्या साठी विशेष प्रयत्न करून याचा उलगडा आणावा अशी विनंती केली.
त्यांनी ओबीसी पंच चे  श्री मेहता साहेब यांना व्यक्तिगत फोन केल्याबद्दल त्यांचे आभार पण व्यक्त केले.
त्यांनी पण त्यांचा तर्फे भरपुर प्रयत्न करुन शिंपी समाजाला ओबीसी कॅटेगरी मधे समावेश होईल या साठी नक्कीच जरूरी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
एकंदरीत आपला समाज आता ओबीसी कॅटेगरी मधे येईल या अशी अपेक्षा आहे.
     यावेळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते .


Post a Comment

Previous Post Next Post