कोकण विभाग शिक्षक आमदार मतदार संघ निवडणुकीसाठी ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या उमेदवारीचा श्रीफळ 1 ऑगस्ट 2022 रोजी वाढवणार.........

ठाणे सत्यप्रकाश न्यूज 
     कोकण विभाग  शिक्षक मतदार संघातील   ठाणे ,पालघर, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग  मधील सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक , शिक्षक- शिक्षकेतर बंधू भगिनींना कळवण्यात येते की, कोकण विभाग "शिक्षक आमदार" मतदार  संघासाठी  निवडणुकीचे बिगुल वाजले आहे  , फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक   होईल या निवडणुकी साठि शिक्षकांचे मदतीला धावून येणारे
         महाराष्ट्र राज्यातील शिक्षक- शिक्षकेतर बंधू-भगिनींसाठी अहोरात्र मेहनत करणारे ,  अनुदान- पेन्शन   आणि अन्य प्रश्नांसाठी सातत्याने आंदोलन करणारे व सहभागी होणारे ,  निस्वार्थपणे शिक्षक- शिक्षकेतर बांधवांच्या शैक्षणिक समस्या  सोडवण्यासाठी झटणारे, तरुण तडफदार नेतृत्व   महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक सेनेचे अध्यक्ष ,  ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर विधान परिषदेमध्ये जाऊन शिक्षक -शिक्षकेतरांचे ज्वलंत शैक्षणिक प्रश्न सुटावेत म्हणून सर्व बांधव डोळे लावून बसलेले आहेत, अडचणीत असणाऱ्या शिक्षक -शिक्षकेतर बांधवाला ज्ञानेश्वर म्हात्रे सर   नेहमीच हवे - हवेसे व आपापलेस वाटतात,  आजपर्यंत  म्हात्रे सरांकडे समस्या घेऊन गेलेे शिक्षक कधीच खाली हाताने  परत आलेले नाहीत ,त्यात त्यांना यश मिळाले आहे*
        या दहा वर्षात  7  हजारापेक्षा   अधिक शिक्षक- शिक्षकेतर बांधवांची   प्रलंबित  शैक्षणिक कामे केली आहेत , त्या कामाच्या  मिळालेले यशावर व  आपणा सर्वांच्या आशीर्वादावर   म्हात्रे सरांना विधान परिषदेमध्ये पाठवण्यासाठी  महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ ,महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना , महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना,  महाराष्ट्र  कास्ट्राईब संघटना ,  कलाध्यापक व क्रीडा संघटना,  तसेच शिक्षकेतर संघटना  यांच्या सहकार्याने व पाठिंब्याने सोमवार दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी प्राचीन "शिवमंदिर अंबरनाथ" या ठिकाणी  सकाळी. 9.30  वाजता श्रीफळ वाढवून   निवडणुकीच्या  प्रचाराचा शुभारंभ केला  जाणार आहे*
         सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना  आपल्या हक्काची निवडणूक जिंकण्यासाठी  "शाळा वाचवा शिक्षक वाचवा"  व "ज्ञानासाठी सदैव जावू" !  हे ब्रीद वाक्य  उराशी घेऊन  सतत झटणाऱ्या सरांना  पाठिंबा व आशीर्वाद द्यावेत ही विनंती
     आपल्या भेटीसाठी म्हात्रे सर  लवकरच आपल्या शाळा शाळां मध्ये  येतील.
शिक्षकांचा आमदार शिक्षकच असला पाहिजे, आणि तो म्हणजे आपले ज्ञानेश्वर म्हात्रे सरच प्रेरणास्थान असून 
*मा.श्री  ज मो अभ्यंकर साहेब ( अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना)श्रद्धास्थान स्वर्गीय  साबीरभाई शेख*( माजी कामगार मंत्री)स्वर्गीय रामनाथ मोते सर ( माजी शिक्षक आमदार)
जाहीर पाठिंबा
 जे के पाटील ( अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ) सुधीर घागस   (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती)
 रवींद्र पालवे  (कार्याध्यक्ष  महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना) अशी माहिती
विष्णू  विशे संपर्कप्रमुख ठाणे जिल्हा शिक्षक सेना यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post