आज बाळगंगाधर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनित्त सामाजिक व राजकीय कार्याचे जनक.......

          लोकमान्य बाळगंगाधर टिळक याांना पुुुुुुण्मतिथीनिमित्त विनम्र अभिवादन  - सत्यप्रकाश न्युज 
       लोकमान्य बाळ गंगाधर  टिळक भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेते म्हणून प्रसिद्ध होते.बाळ गंगाधर टिळक भारतीय क्रांतिकारी शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते,वकील व भारतीय स्वातंत्र्यसेनानी देखील होते. भारतीय स्वतंत्रता आंदोलनाचे ते पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकारी त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असे म्हणत. त्यामुळेच त्यांना "लोकमान्य" ही पदवी बहाल करण्यात आली.
     लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै १८५६ साली रत्नागिरी जिल्ह्यातील ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मुळगांव कोकणातील चिखली हे होते. टिळकांचे वडील एका शाळेत शिक्षक असुन संस्कृत विषयाचे ज्ञानी पंडित होते. टिळक अवघ्या सोळा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.1877 साली पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. त्याकाळी फार नगन्य लोक महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकत होते. 1871 साली त्यांचा विवाह सत्यभामाबाई यांच्याशी झाला. त्यांनी वकिलाची पदवी मिळवली एका खाजगी शाळेत टिळकांनी गणित शिक्षक म्हणून कार्य केले 1876 मध्ये बी.ए.गणित विषयात  ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. आणि 1879  साली  एल.एल.बी.प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. 
       पत्रकार म्हणून कार्य करत असतांना सगळ्याच सामाजिक चळवळींमध्ये ते सहभागी होते. टिळक म्हणायचे की धार्मिक आणि वास्तविक जीवन वेगळे नाही. फक्त संन्यास घेणे जीवनाचा मुख्य हेतू नसावा. जीवनाचा खरा आनंद देशाला घर समजून त्याकरता कार्य करणे हा आहे.प्रथम आपण मानवतेची पूजा करण्यास शिकायला हवे. तेव्हाच परमेश्वराची पूजा करण्यालायक आपण बनवू शकतो.महाविद्यालयीन मित्र महादेव बल्लाळ नाम जोशी, गोपाल गणेश आगरकर,विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या समवेत टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या एज्युकेशन सोसायटीचा मुख्य उद्देश भारतात शिक्षणाचा प्रसार करणे व युवकांना नवी प्रेरणा शक्ती देणे हा होता. पुढे टिळकांनी उच्च माध्यमिक शिक्षणाकरता न्यू इंग्लिश स्कूल व महाविद्यालय शिक्षणाकरता फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. 
         लोकमान्य टिळकांवर 1908 साली राजद्रोहाच्या खटला चालला. त्यात त्यांना सहा वर्षाची शिक्षा झाली.त्यांना ब्रह्मदेशात मंडालेच्या कारागृहात पाठवण्यात आले.तेथे त्यांनी "गीता रहस्य" हा अतुलनीय ग्रंथ लिहिला. भरकटलेल्या युवकांना दिशा देण्यासाठी व त्यांच्यात एकी निर्माण करण्यासाठी शिवजयंती व गणेशोत्सव कार्यक्रम राबविला.'संघशक्ती बलियशी' या उक्तीप्रमाणे युवक शक्तीला दिशा दिली. 1916 साली त्यांनी डॉ.अॅनी बेझंट यांच्या सहकार्याने "होमरूल लीग संघटनेची"स्थापना केली. होमरूल म्हणजे आपल्या राज्याचे प्रशासन आणि आपण करावयाचे यालाच स्वशासन देखील म्हणतात. हिंदी भाषेला राष्ट्रभाषेच्या दर्जा मिळवायला हवा याकरता त्यांनी सर्वात आधी पुढाकार घेतला. टिळक "लाल बाल पाल"या त्रिमूर्तींपैकी एक होते.एक सामाजिक व राजकीय नेतृत्व लोकमान्य टिळक  १ ऑगस्ट १९२० रोजी अनंतात विलीन झाले.त्यावेळी संपूर्ण देशावर दुःखाचा डोंगर कोसळला.अशा या महान देशभक्तास कोटी कोटी    शब्दांकनप्रा.आर.डी.सोनवणे,      
    वनवासी विद्यालय व एस.सी.चव्हाण               कनिष्ठ महाविद्यालय, चिंचपाडा 
            ता.नवापूर जि.नंदूरबार.

Post a Comment

Previous Post Next Post