खान्देश कन्या कानुबाई मातेला भक्तीमय वातावरणात निरोप.....

नवापूर- सत्यप्रकाश न्यूज 
      खान्देश कन्या व खान्देश वाशियांचे श्रद्धास्थान कन्हेरची कानुबाई मातेचे श्रावण महिन्याचा पहिल्या रविवारी आगमन होते व एका रात्रीचा  मुक्काम नंतर सोमवारी आपल्या सासरी पुन्हा प्रयाण करते काल पहिल्या रविवार असल्याने शहरात विविध परिसरात या अराध्य दैवतचे आगमन अतीशय आनंद व उत्साहात करण्यात आले गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या या दैवतचे स्वागत करण्यासाठी शहरातील महिला वर्गात अभूतपूर्व उत्साह दिसून आला होता.
     आपल्या अराध्य दैवत चे दर्शनासाठी व रोटचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी परिवारातील दूर दूर असलेले सदस्य विशेष या उत्साहात उपस्थित असतात यात सूरत ,नाशिक, पुणे,आदि ठिकाणाहून भाविकांनी नवापूरात हजेरी लावली
      अहिराणी गीत ,भजन ,नृत्य करत रात्रभर जागरण करून आज आपल्या अराध्य देवतेला जडअंतकरणाने वाळि वाळि ये जो व मनी कानबाई माय म्हणत निरोप दिला.,
     शहरातील विविध भागात असलेल्या कानुबाई माता ढोल, ताशा,फुगडी खेळत मध्यवर्ती ठिकाणी दत्त मंदिर जवळ एकत्र जमा झाल्यात तदनंतर रंगावली नदीत विसर्जन करून आपल्या दैवत ला निरोप दिला.

Post a Comment

Previous Post Next Post