तालुक्यातील चिंचपाडा येथील वनवासी विद्यालय व एस.सी.चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात आज 1आॅगस्ट लोकमान्य टिळकांच्या 102 वी पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्यात.त्यात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.यात खालील विद्यार्थीनी पारितोषिक प्राप्त केले.
१.वर्षा नाईक, २.ऋत्विक गावीत, ३.जयमाला वसावे,३.विशाल नाईक (विभागून) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री इम्रान पठाण सर यांनी केले. तसेच प्रमुख वक्ते श्री विकास सपकाळे सर यांनी आपल्या मनोगतातून टिळकांचा जीवन वृत्तांत विद्यार्थांसमोर मांडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आर डी सोनवणे सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की संत ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे "हे विश्वचि माझे घर" टिळकांनी देशालाच आपले घर मानले होते. विद्यार्थींनी आपली शाळा आपले घर समजून आपण शाळेत स्वच्छता ठेवणे व वृक्षारोपण करणे आवश्यकआहे. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री निलेश भागवत सरांनी केले. या कार्यक्रमात श्री. प्रेमल पाडवी सर उपस्थित होते. सुत्रसंचलन श्री.शुभम परदेशी यांनी केले.
आदर्श प्राथमिक शाळा नवापूर
"मार्च" शिक्षण संस्था संचालित आदर्श प्राथमिक शाळा नवापूर, शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली .याप्रसंगी संस्थेचे मानद सचिव आदरणीय मा. श्री अनिलभाई सुदामभाई पाटील सो.अध्यक्षा मा.श्रीमती सरलाताई गोविंद वसावे, संचालिका ताईसो.मा. सौ .संगीताबेन अनिलभाई पाटील मानद खजिनदार माननीय श्री भरत दादा पाटील संचालक मा.श्री. डॉ.चेतन दादा अनिलभाई पाटील उपस्थित होते. संचालक मा.श्री .डॉ. चेतनदादा अनिलभाई पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले . मुख्याध्यापक श्री. मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता तिसरी व चौथी च्या विद्यार्थ्यांनी ,*टिळकांचे बालपण* या विषयावर अतिशय उत्स्फूर्तपणे भाषणे केली. 25 विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला .सहभागी विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन व कौतुक केले .प्रास्ताविक श्री .संतोष आहेर सरांनी केले व आभार सौ. स्मिता पाटील यांनी मानले. तसेच सौ.मीनाक्षी आहेर सौ .माधुरी शिंपी सौ.कुंदा गावित सौ .संगीता भोई, श्री .अनिल पेंढारकर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
========================
सार्वजनिक मराठी प्राथमिक शाळा, डुबास बिल्डींग, नवापूर या शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न
नवापूर - दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित सार्वजनिक मराठी प्राथमिक शाळा डुबास बिल्डींग नवापूर, येथे दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या वर्षी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री महेश पाटील सर होते,
सर्वप्रथम कार्यक्रमाला उपस्थित अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षिका श्रीमती योगिता पाटील यांनी केले. इयत्ता बालवाडी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या जीवनपटावर आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महेश पाटील यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका श्रीमती माधुरी चित्ते व आभार श्रीमती मनीषा भदाने यांनी केले. मुख्याध्यापक श्री महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती मीना तांबोळी श्रीमती हेमलता पाटील श्रीमती करुणा पाटील श्रीमती रेसा मावची यांनी परिश्रम घेतले.