धुळे सत्यप्रकाश न्यूज
या शैक्षणिक वर्षींची संचमान्यता ३१ जुलैच्या विदयार्थी पट संख्येवर होणारअसल्याचे आदेश शिक्षण विभागाकडून काढले असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून सरल प्रणालीची अनेक कामे पेंडिंग असल्याने संचमान्यतेसाठी ३० सप्टेंबरची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शिक्षक आघाडक विभागीय अध्यक्ष महेश मुळे यांनी शासनाकडे केली आहे. याबाबत महेश मुळे यांनी शिक्षणसंचालक व शिक्षण आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. सरल पोर्टलवर विद्यार्थी नोंदणी करतांना नव्याने प्रवेश घेतलेल्या अनेक विध्यार्थांचे पालकांनी आधार कार्ड काढलेले नाहीत.आधार केंद्रांची संख्या ग्रामीण भागात कमी आहे. पहिलीच्या काही विद्यार्थ्यांचे हाताचे ठसे व्यवस्थित उमटत नसल्याने आधारकार्ड काढण्यास अडचणी
निर्माण होत आहेत.अनेक विद्यार्थ्याच्या आधारकार्डात नाव व जन्म तारीख इत्यादीमध्ये स्पेलिंग इत्यादी चुका आहेत.त्याची जलद दुरुस्ती होत नाही.परप्रांतीय विद्यार्थ्याचे आधार कार्डवर संपूर्ण नाव नसल्यामुळे अशा विद्यार्थ्यांची नोंदणी करणे अडचणीचे ठरत आहे. पहिलीला प्रवेश घेणारे विद्यार्थी यांचे जन्म दाखले सहा सात वर्षापूर्वी चे असल्याने आधारकार्ड काढतांना नवीन क्यूआर कोडचा जन्म दाखला असणे आवश्यक आहे.
सदर बाबींचा विचार करता आधार कार्ड काढणे व अपडेट करणे इत्यादी साठी अधिक वेळेची आवश्यकता आहे. त्यामुळे ३१जुलैच्या विद्यार्थीसंख्येवर आधारित संच मान्यता केल्यास अनेक शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. तरी पूर्वीप्रमाणे संच मान्यता ३०सप्टेंबरच्या पटावर निश्चित करण्यात यावी अशी मागणी
भाजपा शिक्षक आघाडी विभागीय अध्यक्ष
महेश मुळे ,प्रदेश सदस्य डाॅ नितिन कापडीस,धुळे महानगर संयोजक मनोहर चौधरी ,अविनाश पाटील , जितेंद्र कागणे ,रोहिणी मुळे , अपर्णा पाटील ,आनंद पाटील, संदीप सोनवणे ,योगेश देवरे ,देवेंद्र गिरासे ,कमलेश भदाणे ,प्रवीण बाविस्कर, अमोल शिंदे ,विनोद जैन इंद्रजित जमादार ,कैलास अमृतकर, संजय वाघ , भुपेद्र मालपुरे निवेदना द्वारे यांनी केली आहे
Tags:
शैक्षणिक