ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी घेतली आढावा बैठक


       मुंबई सत्यप्रकाश न्युज 
     ठाणे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयामध्ये बैठक घेतली, या बैठकीकरिता शिक्षणाधिकारी श्री. देविदास महाजन साहेब, वेतन पथक अधीक्षक सौ. रूपाली खोमणे मॅडम, लेखा अधिकारी श्री. दिलीप घनघाव साहेब, यांच्या समोर जवळपास ठाणे जिल्ह्यातील 150 पेक्षा जास्त समस्या मांडल्या, *त्यातील महत्वाचे म्हणजे आज आदिशक्ती कन्नड हायस्कूल या शाळेतील कुमारी आदिती राव हिची अनुकंपा तत्वावर नियुक्ती झाली होती तिची घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने आणि घरी कोणीही कमवते नाही ही बाब आमदार म्हात्रे साहेबांच्या लक्षात येताच आमदार साहेबांनी सदरचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांना तत्काळ तपासायला सांगितला त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी नसल्यामुळे सदरच्या प्रस्तावास तात्काळ मान्यता देण्याच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे कुमारी अदिती राव हिला वैयक्तिक मान्यतेचे आदेश आज देण्यात आले*, अशा अनेक समस्या ह्या तात्काळ सोडवण्यात आल्या, काही समस्या या पुढील पंधरा दिवसांमध्ये सोडविण्याच्या सूचना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांनी दिल्या. 
  या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे व ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गणेश पाटील सर, भाजपा शिक्षक आघाडीचे  सहसंयोजक विकास पाटील सर, कलाध्यापक संघटनेचे बेंडाळे सर,  सर्व तालुका अध्यक्ष, सेक्रेटरी, उपाध्यक्ष पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.
    आज जवळपास 150 पेक्षा जास्त शिक्षक व शिक्षकेतर बांधवांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या शिक्षकांचा आमदार शिक्षक असल्यामुळे शिक्षकांच्या सर्व समस्या आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांमुळे सुटत आहेत, अशा प्रकारे प्रत्येक महिन्याला शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन समस्या सोडविणारे आमदार आम्हाला लाभले याचा आनंद सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर होता सर्व शिक्षकांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे आभार मानले आणि बैठक संपवली.


Post a Comment

Previous Post Next Post