निवडणूक कामकाजाकरिता 18, 19,20 अश्या सुट्टीच्या संदर्भात शिक्षण आयुक्तांचे पत्र व्हाट्सअप वर फिरत आहे
याबाबतीत कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी माननीय शिक्षण आयुक्त श्री सुरज मांढरे साहेब यांना फोन करून शिक्षकांना 19 20 आणि 21 अशी सुट्टी देणे गरजेचे आहे
त्यावर त्यांनी सांगितले की 18 तारखेला ज्या शाळांमध्ये मतदान केंद्र आहेत त्या शाळांमध्ये सीसीटीव्ही लावायचे आहेत, परंतु सर्व शाळांमध्ये मतदान केंद्र नसल्याने 18 तारखेला सुट्टीची गरज नाही, निवडणुकीचे प्रत्यक्ष काम 19 व 20 तारीख ला असल्याने त्या दिवशी शाळांना सुट्टी राहील मात्र 20 तारखेला निवडणुकीचे साहित्य जमा करण्यामध्ये रात्री उशीर होऊ शकतो म्हणून ऑटोमॅटिकली ती 21 ला सुट्टी ज्या शिक्षकांना साहित्य उशिरा जमा करायला लागणार आहे त्यांना मिळेल, 21 ची सुट्टी ऑफिशियल डिक्लेअर जरी नसली तरी रात्री उशिरापर्यंत साहित्य जमा करावे लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना ती सुट्टी द्यावी असे सांगितले आहे. अशी माहिती विष्णू विशे संपर्कप्रमुख यांनी दिली आहे.
Tags:
सामाजिक