४-नवापूर विधानसभा मतदारसंघमध्ये मा भारत निवडणूक आयोगाचे निर्देशाअन्वये ८५ वर्षे वयावरील मतदार व PWD मतदार यांचे गृहभेट मतदान आज दिनांक१४/११/२०२४ पासुन सुरू करण्यात आले आहे.
आज शहरातील ज्येष्ठ नागरिक व माजी नगराध्यक्ष, उद्योजक विपिनभाई चोखावाला यांनी पहिले मतदान करुन गृहभेट मतदानाद्वारे हक्क बजावला
सदरचे मतदान मतदारसंघात दिनांक १४/११/२०२४ व दिनांक १५/११/२०२४ या कालावधीत पार पडणार आहे.
जर एखादा मतदार पहिल्या भेटीत अनुपस्थित आढळून आले तर दिनांक १६/११/२०२४ रोजी दुसऱ्या भेटीवेळी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
याकरिता एकुण ९ मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सदर पथकांसोबत आवश्यक पोलीस बंदोबस्त व व्हिडिओग्राफर पुरविण्यात आलेले आहे.
सदर मतदान प्रक्रिया निवडणुक निर्णय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येत आहे 
Tags:
शासकीय