भारतीय खो-खो महासंघाचया आयोजनाखाली वइंदिरा गांधी स्टेडियम', दिल्ली येथे पहिल्या वर्ल्डकप खो-खो स्पर्धेचे आयोजन दिनांक 13 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत करण्यात आले होते. या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेकरता महाराष्ट्र शासनाने दहा कोटी रुपये मंजूर केले होते. सदरची रक्कम स्पर्धेसाठी त्वरित अदा करण्यात आलेली होती. या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला खेळाडूंनी या स्पर्धेतील सुवर्णपदक पटकावले आहे. व भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. महाराष्ट्र राज्यातील आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात येणाऱ्या योजनेकरिता शासनाने दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय पारित केला आहे.
या शासन निर्णयाला अनुसरून महाराष्ट्रातील सुवर्णपदक प्राप्त पुरुष व महिला खेळाडू आणि त्यांच्या मूळ मार्गदर्शकांचे विहित नमुन्यातील अर्ज क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडे वेळेत सादर करण्यात आले आहे. परंतु अद्यापही या खो-खो खेळातील पहिल्या विश्वचषक स्पर्धेतील सुवर्णपदक प्राप्त खेळाडूंना आजवर पुरस्काराची रक्कम मिळाली नाही, तसेच खेळाडूंना प्रथम दर्जाची नोकरी सुद्धा देण्याचे आश्वासित केले होते. अजून पर्यंत कार्यवाही झालेले, म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी सदरची माहिती पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे विधिमंडळात मांडून शासनाचे लक्ष वेधलेले आहे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Tags:
शैक्षणिक