नाशिक सत्यप्रकाश न्युज
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ संलग्न अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघ, महाराष्ट्र यांनी राज्यात सामुहिक रजा आंदोलन केले.
मागील तीन-चार महिन्यांपासून नागपूर विभागातील बोगस शालार्थ मान्येतेचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. या प्रकरणात काही अधिकारी व कर्मचारी यांना कोणतीही चौकशी न होता अत्यंत अपमानास्पदरित्या झालेल्या अटकेचा संघटनेच्या वतीने आम्ही शिक्षण सेवेतील सर्व अधिकारी निषेध करत आहोत.
वरील प्रकरणात खरोखर ज्यांनी बोगस शालार्थ आयडी देण्याचा गुन्हा केला असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी संघटनेची मागणी आहे. तथापि सदर प्रकरणात "चोर सोडून संन्याश्याना फाशी" या म्हणी प्रमाणे तपास यंत्रणा काम करत आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कायदयाने दिलेले संरक्षण नाकारून बिनाचौकशी अटक झाल्याने शिक्षण विभागातीन अधिकाऱ्यांमध्ये दहशत न भितीचे बातावरण निर्माण झाले आहे हे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागातील अधिकारी प्रचंड ताण-तणावाखाली काम करत आहे हे-शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे बुद्धमीय सुध्दा समाजात अपमानास्पद रित्या जीवन जगत आाहे. महाराष्ट्र शिक्षण सेनेतील अधिकारी हे राजपत्रित अधिकारी असून ते महाराष्ट्र शासनाने काम नियमानुसार व प्रामाणिकपणे करत असतात. ते गुन्हेगार नसून कदाचित काम करत असतांना काही त्रूटी, चूका होऊ शकतात. ज्यासाठी विभागांतर्गत चोकशीची व कारवाईची व्यवस्था कार्यरत आहे. अधिकारी यांच्या कामात अनियमितता आढळल्यान महाराष्ट्र नागरी सेवा नियमाप्रमाणे शास्तीची तरतूद आहे. तथापि छोट्या-छोट्या प्रशासकीय कारणांवरून शिक्षण विभागातील अधिकारी यांचे शासनाची परवानगी नसतांना बिना चौकशी अमानवीय पध्दतीने अटकसत्र सुरू आहे. या बावीचा निषेध म्हणून आज आंदोलन करण्यात आले व महसूल आयुक्त प्रविण गेडाम यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी नाशिक महसूल आयुक्त प्रविण गेडाम साहेब यांना साहेब,अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांना निवेदन देतांना शिक्षण सहसंचालक मा रमाकांत काठमोरे , विभागीय सचिव मा.मोहन देसले, राज्य सरचिटणीस मा.सरोज जगताप, सहसचिव डॉ मच्छिंद्र कदम, शिक्षणाधिकारी माध्यमिक मा.प्रविण पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक मा भास्कर कनोज , शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष मा.कैलास सांगळे, उपशिक्षणाधिकारी प्रकाश अहिरे, दिलीप जऊलकर, नीलेश पाटील शरद चव्हाण, नितीन पाटील, प्रशासन अधिकारी मनपा नाशिक डॉ मीता चौधरी, प्रमोद चिंचोले , शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष मा.कैलास सांगळे, दिनेश देवरे, नीलेश पाटोळे ईतर अधिकारी वर्गसामुहिक रजा आंदोलन केले .
Tags:
शासकीय