तालुक्यातील चिंतवी जि.प. पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदान कर्मचारी शनिवारी २३ मतदान बुधवर मतदान साहित्य घेऊन रवाना झाले. आज रविवार दि. ५ जून रोजी मतदान होणार असून यासाठी १४० कर्मचान्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मतदान कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी १५ वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. शनिवारी सकाळ पासुन निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती कल्पना निळे - दुबे, तहसिलदार मंदार कुलकर्णी,नायब तहसिलदार जितेंद्र पाडवी या सर्व निवडणुक कामावर लक्ष ठेऊन आहेत. निवडणूक प्रक्रिया मुरव्यंतपणे राबवली जावी यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे सुनिल सुरेश गावीत व अपक्ष उमेदवार रविंद्र नकट्या गावीत या दोघांमध्ये सरळ लढत होत असून दोघांचे भवितव्य आज दि. ५ रोजी मतदान यंत्रात बंद होणार आहे. आज सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. उद्या दि. ६ जून सोमवारी सकाळी दहा वाजेपासून २३ केंद्रांवर मतदार बजावणार हक्क १४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.