नवापूर वनविभागाने केले 3 लाखाचे सागवान जब्त ..............

नवापूर सत्यप्रकाश न्यूज 
    दिनांक 05/06/2022 , रविवार रोजी पहाटे  म.सहाय्यक वनसंरक्षक  नंदुरबार (प्रादेशिक व वन्यजीव) ,यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून त्याच्यासह म.वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक, , वनक्षेत्रपाल नवापूर रेंज स्टाफसह मौजे- बोरविहीर , बारी , काळंबा या गावातील गुमान  गावीत,कुष्या गावीत,रा.बोरविहिर,दिलीप गावीत व सुभाष राहणार  काळंबा यांच्या घराची सर्च वॉरंट ने झडती घेतली त्यात 53 साग चौपाट नग मिळून आले तसेच बारी गाव महसूल शिवारात एका झोपडी जवळ मारुती सुझुकी फंटी GJ 19 A.1448 या वाहनाची तपासणी केली असता त्यात साग चौपाट 11 नग मिळून आले सदरील वाहन व  साग चौपाट नग शासकीय विक्री आगार नवापूर येथे पावतीने जमा केला 
   सदर कार्यवाहीत *एकूण साग चौपाट - 64 व एक मारुती सुझुकी अल्टो वाहन ०१ जमा करण्यात आले आहे  सदर मालाची बाजार भावानुसार अंदाजीत किंमत 2.5 ते 3 लाख रुपये आहे.
          सदर कारवाहीत म. धनंजय ग.पवार सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव )नंदुरबार व श्रीमती. स्नेहल अवसरमल वनक्षेत्रपाल नवापूर प्रा., वनपाल दराडे,वनरक्षक - कमलेश वसावे ,वाहन चालक - एस.एस. तुंगार आणि दिलीप गुरव, वनमजूर- बाळकृष्ण गावीत, अनिल गावीत , दिनेश गावित यांनी सहभाग भाग घेतला.
   सदर कार्यवाही ही  म.दि.वा.पगार वनसंरक्षक धुळे ,म. उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा श्री. कृष्णा भवर, श्री. रेवती कुलकर्णी ,विभागीय वनअधिकारी दक्षता,धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे .
     म.सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा यांजकडून जनतेस आवाहन करण्यात येते की, वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा ही विनंती.

Post a Comment

Previous Post Next Post