नाशिक येथील शिंपी कुटुंबाने साकारलेली रामकुंडाची पर्यावरणपूरक प्रतिकृती ठरतेय लक्षवेधी

     नाशिक सत्यप्रकाश न्युज
    येथील शिंपी बाधवानी केलेल्या यदाच्या गणेशोत्सवाचा देखावा हा नाशिक करासाठि आगळा वेगळा असुन येणाऱ्या कुभमेळयात काय करायचे असा अनमोल सदेश देण्यात आला असुन गोदावरी नदिचे महत्व समजून घ्या व तीला पवित्र व स्वच्छ कसे ठेवता येईल याची माहिती दिली आहे
  नाशिक येथे आगामी सिंहस्थ महाकुंभ २०२७ साठी तयारी जोरात सुरू आहे. देश-विदेशातून कोट्यवधी भाविक येथे येणार आहेत आणि रामकुंड परिसर हा या महोत्सवाचा मुख्य केंद्रबिंदू ठरणार आहे. तेथील इंदिरानगर भागातील अशोका हॉस्पिटलसमोर शिंपी कुटुंबाने यंदा रामकुंडाची पर्यावरणपूरक प्रतिकृती साकारली  आहे. 
 त्यातून 'श्रद्धा जपा, पण पर्यावरणही वाचवा' असा संदेश देण्यात आला आहे.
   नाशिक येथील इंदिरानगर भागातील विस्टा-२ अशोका हॉस्पिटलसमोर शिंपी कुटुंबाने साकारलेती रामकुंडाची पर्यावरणपूरक प्रतिकृती समाजाला 'श्रद्धा जपा, पण पर्यावरणही वाचवा' असा महत्त्वाचा संदेश देते. प्रतिकृतीत रामकुंडासोबत परिसरातील महत्त्वाची मंदिरे, श्री देवमामलेदार समाधी मंदिर, श्री सिद्ध पाताळेश्वर मंदिर आणि अतिप्राचीन
गोदावरी मंदिर: त्याचबरोबर दुतोंड्या हनुमान, महिलांसाठी वस्त्रांतरगृह, त्यावरील मोठे घड्याळ आणि गोमुखातून वाहणारे पाणी, जसे प्रत्यक्ष गौमुखासारखे दिसते.
   गोदा आरतीही या प्रतिकृतीत साकारली आहे.
सजावटीतील मुख्य आकर्षण शाडू मातीची गणेशमूर्ती, मातीचा गणपती, निसर्गाची प्रगती, साधूच्या रुपात एका पायावर उभा बाप्पा, हातात कापडी पिशवी धरून 'नो टू प्लास्टिक बॅग'चा संदेश देतो. ही मूर्ती धार्मिक आस्था आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यांचा संगम दाखवते. या संपूर्ण प्रतिकृतीसाठी पर्यावरणपूरक साहित्य वापरलेले आहे. 
    आपण सर्वांनी मिळून गोदावरीचे रक्षण केले, तर ती अविरत, निर्मळ वाहत राहील आणि नाशिकचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल होईल. आरास साकारण्यासाठी राहुत शिंपी व त्यांच्या परिवाराला दोन महिन्यांचा कालावधी लागला. हा देखावा पाहण्यासाठी शहरातून भाविक येत आहेत.
    

Post a Comment

Previous Post Next Post