आरोग्य धनसपदा सदरातील आजीबाईच्या बटव्यात
विषय - चेहऱ्यावर. ओठ काळे होणे.
डोळ्याखाली त्वचा काळपट होणे.
डोळ्याखाली त्वचा काळपट होणे.
सौ.साधना देशपांडे.राईचा वाडा.
जिवनात कधीही वयाप्रमाणे वाढ होताना शरीरावर काही त्वचा विकार आणि त्यांची लक्षणे अचानक येत असतात. त्यातील आपले चेहऱ्यावरील ओठ काळे होणे. डोळ्याखाली वर्तुळाकार काळसर रंग किंवा किंचित पुरळ येणे. याची अनेक कारणे असतात. त्यापैकी वयाप्रमाणे आपल्या आहारामध्ये पोषक तत्वांची म्हणजे जीवनसत्वाची कमतरता होत असल्यास उदाहरणार्थ जीवनसत्व बी १२ / लोह- आयर्न चे प्रमाण कमी होणे. कधी शरीरातील हार्मोन्स बदल होत असतात. त्याची कारणे म्हणजे आपले दैनंदिन वागणे. हसणे. बोलणे. असमाधान. वैचारिकता. ताण तणाव. इत्यादी गोष्टी जर कमी झाल्या तर चेहऱ्यावर काळपट वांग तयार होतात. आणि हॉट आपोआप काळे होतात. त्यापैकी आणखी महत्त्वाची कारणे खालील प्रमाणे असतात. आपण आपल्या दैनिक कामासाठी रोज बाहेर जात असताना अति उन्हात. प्रखर सूर्यप्रकाशात जात असतो. काही माणसं धूम्रपान सतत करतात. अती मसालेदार . चटणी. हिरवी मिरची खाण्याची सवय असेल तर
अपचनामुळे शरीरात नियमित डीहायड्रेशन होते. त्याचप्रमाणे जर डॉक्टरांनी एखादे अँटिबायोटिक्स चा डोस जास्त प्रमाणात दिला गेला. तर ओठांना ऍलर्जी स्वरूपात काळपट पणा त्वचेवर येतो. कधी त्या ओठांना खाज येऊन ओठ -- चुळचुळ करतात. कधी कधी आपण एखाद्या कार्यक्रमाला किंवा लग्न / साखरपुडा या कार्यक्रमांना जाताना कळत न कळत बाजारात मिळणारे " लिपस्टिक " हे डुप्लिकेट कंपनीचे किंवा मासिकांच्या जाहिरातीवर ऑनलाइन मागवलेले लिपस्टिक ओठावर लावल्याने आपणास ओठ व आजूबाजूची त्वचा मधील मेलोनाईन घटक काळसर पट्टा तयार करतो. खरं म्हणजे या घटकांमुळे आपल्या त्वचेवर रक्तपेशींचा लालसर रंग येत असतो. पण चुकीच्या लिपस्टिक लावल्याने ओठ काळसर. भुरकट पडतात आणि चेहऱ्याचे सौंदर्य खराब होऊन कायमचा हा विकार तयार होतो. पुढे त्वचेचा कर्करोग ही होऊ शकतो.
आपण प्रत्येक कार्यक्रमाला जात असताना तेथील कार्यक्रमात मैत्रिणी. नातेवाईक. भरपूर प्रमाणात भेटतात. अशावेळी आपण एकमेकांना भेटतो. भेटताना भरपूर गप्पागोष्टी करून काही जीवनातील घडलेले प्रसंग . जोक्स. मागील आठवणी - यावर बोलत असतो. सहज विनोद होऊन भरपूर हसतो. हसताना सुरुवातीला आपले गुलाबी मऊ ओठ आणि आतील पुढील दात आपोआप दिसतात. त्यावर जर आपले ओठ काळपट त्यात भेगा . भुरकट . चिरा पडलेले ओठ समोरच्या माणसाला / बाईला दिसले तर आपणास वाईट वाटतंय. आपली शरमेने नजर इकडे तिकडे फिरवतो . आपणच आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. आपला चेहरा नेहमी आपले भविष्य दुसऱ्याला नकळत सांगत असतो. म्हणजे चेहरा हा आरसा आहे. त्यावर आपले समाधान. जीवनातील सुखदुःख. वैचारिकता. ताण तणाव... हे कपाळावरील रेषा. डोळ्यातील तेजस्विता. नाकाची ठेवण. गालाचा गोबरेपणा. ओठाची किमया. हे सर्व आयुष्याचे समाधान अ समाधान दुसऱ्यांना कळवतात.
हिवाळ्यामध्ये भर थंडीत ओठांचे दुखणे सुरू होते. गार हवेत ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने आपल्या त्वचेवर कोरड पडते. त्वचा गार होते . त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडणे. त्वचा विकार होणे. त्वचेवर किंवा ओठावर जखमा होऊन चिरा पडतात. याला कारण आपल्या चुकीच्या सवयी आणि वागण्याच्या खाण्याच्या पद्धती आहेत. आपण प्रत्येक जेवणानंतर ओठांना पाणी लावणे आणि दातांना बोटाने चोळावे. चेहऱ्याला नियमित स्क्रबिंग करावे म्हणजेच चोळावे. लाल किंवा गुलाबी रंगाचे पाऊच .पावडर चेहऱ्यावर आणि ओठांना लावावे . नाहीतर थंडीच्या दिवसात व्हॅसलीन बोरो प्लस कंपनीचे नाहीतर मोहरी तेल. राई तेल. आवळा तेल सर्व हातापायांना लावून चेहऱ्याला आणि ओठांना व पोटाच्या नाभीला रोज झोपताना नेहमीच लावावे. नाभी हा शरीराचा केंद्रबिंदू असतो . त्यामुळे सर्व शरीरात अंगातील उष्णता किंवा अति टेन्शन विचार कमी करण्यासाठी नाभीला तेल लावून मसाज करावा. त्यामुळे शांत झोप लागते.
प्रत्येक ओट हे निरोगी आणि आकर्षक नसतात. ते काही सवयीमुळे आपणास करावे लागतात. जर आपले ओठ नैसर्गिक गुलाबी असतील . तर लिपबाम किंवा लिपस्टिक लावण्याची आपणास गरज नसते. आपले सौंदर्य हे ओठांनी नेहमी आकर्षक दिसते. ते बाहेरील केमिकल पदार्थ जास्त डार्क वापरल्याने चेहराच भयानक दिसतो. त्यामुळे जास्त पावडर लावून डार्क लिपस्टिक लावणे धोक्याचे असते.
कधीही ओठांना गरमागरम चहा अथवा कॉफी किंवा अति थंड पदार्थ कोल्ड्रिंक्स. ड्रिंक्स. उत्तेजक पदार्थ जास्त सेवन करू नये . म्हणून आपले ओट काळे. भुरकट. नेहमी खराब दिसतात. सर्वसाधारण लाईट रंगाचे सौंदर्य स्त्रियांना नेहमी खुलवत असते.
वरचे ओठ काळे होण्याची कारणे
वरचे ओठ रंग बदलण्याची अनेक घटक कारणीभूत आहेत.
१) आपल्या शरीरातील हार्मोन्स बदल -- मुलगी वयात आल्यावर स्री यामधे रूपांतर होते. आणि मुलगा हा वयात येताना पुरुषार्थ होत असतो. अशावेळी नैसर्गिक रंगात सारे मेलोनिन नावाच्या रक्तातील रंगद्रव्यामुळे त्वचा गोरी अथवा सर्वसाधारण / काळसर रंगाची व्यक्तीला मिळत असते. ते गुणसूत्र . रंग कायामधिल अनुवंशिकतेमुळे अवलंबून असते.
गर्भधारणाच्या दरम्यान शरीरातील हार्मोन्सच्या पातळीत चढ-उतार होताना मेलास्मा नावाचा त्वचा चा रंग मिळतो. त्यामुळे कधी कधी एखाद्या बाळाला चेहऱ्यावर ओठ काळसर. भरकट निर्माण होत असतात.
२) हायपर पिगमेंटेशन -- वयात येताना शरीरातील हार्मोन्स बदलताना काही मुला-मुलींमध्ये पुरळ. चेहऱ्यावर डाग. व्रण येण्याची लक्षणे दिसतात. कधी कधी नोकरीनिमित्त किंवा कामावर जाताना अति सूर्यप्रकाशात प्रवास करताना अथवा त्या ठिकाणी उष्णतेमध्ये. वातावरणात बैठीकाम. मेहनती काम केल्यास शरीरात वर आणि चेहऱ्यावर. डोळ्यांच्या खाली काळे डाग येऊन ओठ काळे पडतात. हे अनुवंशिकतेमुळे होऊ शकते. कधी शरीरात विशिष्ट औषधी. अँटिबायोटिक जास्त प्रमाणात खाल्ल्यास औषधांची ऍलर्जी होते. शरीरात विटामिन ब 12 कमी. लोहाचे प्रमाण कमी असेल तर ओट काळे पडतात.
३) सूर्यप्रकाश -- सततच्या प्रवासात सूर्यकिरणातील अतिनील किरण उष्णता वाहक असल्याने शरीरातील मेलोनिन पदार्थ कमी तयार होतो त्यामुळे ओठाची त्वचा पातळ होऊन अति संवेदना वाहक होते. त्यामुळे उन्हात जाताना सन स्किन क्रीम लावून जावे. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेशात. उन्हाळ्यामध्ये प्रवास करताना वापरावे.
४) धूम्रपानाची सवय -- बऱ्याच स्त्रियांमध्ये त्याचप्रमाणे माणसांमध्ये अति विचार. ताणतणाव. टेन्शनमुळे ड्रिंक्स घेणे . सिगरेट ओढणे. कोल्ड्रिंक्स पिणे त्यातील रासायनिक निकोटीन सुगर कॅम्पर इत्यादी घटकांमुळे ओठातील रक्तवाहिन्या आकुचंन होऊन तेथील रक्तप्रवाह कमी होतो त्यामुळे ओट काळे पडतात.
५) निर्जलिकरण -- काही व्यक्तींना जास्त प्रमाणात मसाला . चटणी . हिरवी मिरची खाण्याच्या सवयीमुळे ऍसिडिटी पचनाचे आजार - अपचन होणे म्हणजे डि - हायड्रेशन नेहमी होते. त्यामुळे शरीरातील शुगर आणि पाण्याचे प्रमाण कमी होते. त्वचा सुरकुते निर्माण करते. पातळ जुलाब . संडास होऊन व्यक्ती गळून जाते. त्यामुळे ग्लुकोजचे प्रमाण कमी होते . आणि ओठातील रंगद्रव्य कमी होऊन भेगा पडतात. तेव्हा पाणी भरपूर प्यावे . सात्विक जेवण करावे.
६) ओट चावणे - काही व्यक्तींना रात्री झोपताना सुद्धा ओट चावणे. दाताचा आवाज करणे. दात खाणे. संतापाने ओरडणे अशा सवयी असतात .अशावेळी लाळेतील पाचक द्रव्यामधील ओठाचा नैसर्गिक स्राव अडथळा आणतो त्यामुळे लाळ कमीच होते आणि जिभेला फोड येणे व्रण येणे जखमा होणे म्हणजेच ब बारा व्हिटॅमिन कमी होऊन ओट काळे पडतात.
७) तोंडाची स्वच्छता - आपल्याकडे रात्री जेवल्यानंतर झोपल्यावर सकाळी उठताना नेहमी पेस्ट आणि ब्रशने दात साफ करून ओठांची सफाई करतो. म्हणजेच त्यांची स्वच्छता ठेवणे आपले काम असते. पण आजच्या परिस्थितीत उठल्यावर प्रथम चहा गरमागरम पिण्याची सवय असते. अशा वाईट सवयीमुळे आपण ओटाची निगा ठेवू शकत नाही. म्हणून काही दिवसांनी ओठ काळे पडतात.
८) जीवनसत्व लोह -- आपल्या शरीरात गुळ.खजुर.या पदार्थांचे आहारात कमी प्रमाण असेल. तर रक्तातील लोह कमी होते. हे अति विचार. टेन्शन . दैनिक ताण तणाव यामुळे किंवा सीजन प्रमाणे मिळणारे फळे. भाजीपाला यांचे प्रमाण कमी असेल तर डोळ्याच्या खाली काळा भाग तयार होतो. त्याला खाज येते कधी पूरळ येते.
उपचार - ओट काळे. व डोळ्याखाली काळसर रंग*
सर्वसाधारण जेवणात समतोल आहार घ्यावा. जेवण सात्विक असावे. जेवणात सॅलड. वरण-भात . पोळी. भाजी. भाकर. हिरव्या कच्च्या पालेभाजीची कोशिंबीर. चटणी पापड .लोणचं. आचार एखादा गोड पदार्थ. सोबत फळ. फळांच्या चिरा. असावा. आणि रोज भरपूर प्यावे. अतिनिल सूर्यप्रकाशात जास्त जाऊ नये. डोक्यावर छत्री किंवा रुमाल .स्कार्फ असू द्यावे.
गुलकंद रोज एक चमचा जेवणानंतर घ्यावे
मध व साखरेचे पाणी ओठांना चोळावे.
बीट रूट मध्ये गुलाब पाणी टाकून ओठांना आणि डोळ्याच्या खाली मसाज करावा.
कधी बदाम तेल. किंवा कधी एलोरा तेल.. नारळ तेल याच्याने मसाज करावा.
आयर्न आणि ब बाराच्या गोळ्या काही दिवस घ्यावे. उदाहरणार्थ ; - Cap Frrium XT -----30----रोज एक रात्री जेवणानंतर.
Cap Rinifol ----30-----रोज एक दुपारी जेवणानंतर.
गुलकंद --१ बाटली -- रोज सकाळी एक चमचा
पाणि भरपूर प्यावे... भरपूर हसावे... भरपूर बोलावे
सकारात्मक जीवन जगावे.
Tags:
आरोग्य