१५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन! दरवर्षी हा दिवस अभिमानाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. सन २०२५ चा स्वातंत्र्यदिन मात्र एका विलक्षण दृश्यामुळे विशेष ठरला.
नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन प्रांगणात राष्ट्रपतींनी सकाळी ध्वजारोहण केले, तेव्हा पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या.पावसात भिजलेले वातावरण,
हिरवाईने नटलेले प्रांगण आणि झेंड्याच्या रंगांना झळाळवणारे थेंब ...हे दृश्य पाहून प्रत्येक भारतीयाचे हृदय आनंदाने भरून आले. राष्ट्रपतींचा ओला पोशाख, पण दृढ उभं राहून त्यांनी दिलेली सलामी, ही प्रतिमा जणू सांगत होती की,“परिस्थिती कितीही कठीण असो, पण राष्ट्राचा सन्मान नेहमी सर्वोच्च असतो.”
त्या क्षणी तिरंग्याच्या प्रत्येक रंगात एक वेगळे तेज दाटून आले होते. केशरी रंगाने शौर्याचा संदेश दिला, पांढऱ्या रंगाने शांततेचे आशीर्वाद दिले आणि हिरव्या रंगाने आशेची नवी पालवी फुलवली. पावसातले ते ध्वजारोहण म्हणजे भारतीय लोकशाहीची ताकद, एकात्मता आणि देशभक्तीचे दैदिप्यमान प्रतीक ठरले.
Tags:
सामाजिक