आरोग्य धनसंपदा आजीबाईचा बटवा
सौ. रत्नमाला पाटील . मु.पो.- राजूर.ता.जि. - नांदेड
विषय - अध्यात्म आणि आजार
खरं म्हणजे ! मानवी जीवनात अध्यात्म आणि आजार यांचा फार जवळचा संबंध आहे. बऱ्याच वेळा मानवी शरीराला एखादी जुनाट व्याधी. आजार. कधी कधी रात्री बे रात्री त्रासदायक वेदना . एखाद्या संकटात आपण दुःखात असलो की देवाचा आधार घेऊन अध्यात्माचे नामस्मरण करून आलेल्या प्रसंगातून सुव्यवस्थेत बाहेर पडतो. तसेच वृद्धत्वानंतर व्यक्ती मृत्यूची झुंज देताना घरात गरुड पुराणाचे वाचन करणे शुभ असते त्यामुळे माणसाला मोक्ष आणि शांती मिळते. असे धार्मिक पोथी पुराण व कुराण हे प्रत्येक जातीपंथामध्ये वाचण्याची प्रथा आज आहे. म्हणजे अध्यात्म आले. धार्मिक अध्यात्म म्हणजे आपण स्वतःला आणि जगाला समजून घेण्याची महत्त्वाची प्रक्रिया असल्यामुळे आपणास शारीरिक आणि मानसिक समाधान मिळते. हे आरोग्यासाठी एक सुंदर उदाहरण आहे. अध्यात्मामुळे जीवनातील दैनिक मानसिक ताण तणाव नैराश्य आणि मनातील चिंता आपोआप कमी करण्यासाठी मानवी स्वभाव नेहमी आपणास सहकार्य करत असतो. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे दोन विचारांचे प्रकार असतात.
संशोधनानुसार वैद्यक शास्त्र त्यातील वैद्य डॉक्टर ऋषिमुनी आचार्य यांनी देखील अध्यात्म म्हणजेच दैविक शक्ती आजही जगात जागृत आहे हे मान्य केले आहे. अध्यात्मिक विचारसरणी आणि त्यांचे मनन. चिंतन. योगनिद्रा . ध्यानधारणा ही एक रोग प्रतिकार शक्ती सुधारण्यास काही अंशी मानवाला मदत करते त्यामुळे अचानक रात्री बेरात्री झालेल्या वेदना किंवा आजार बरे होण्यासाठी अध्यात्माचा सहारा घेतल्यास आपोआप व्यक्तीला फरक पडतो म्हणजेच दैविक शक्ती जागृत होते हा अध्यात्मावरचा विश्वास आपण समजू शकतो. हे एक शास्त्र आहे. अध्यात्म हे नेहमी मानवी शरीरातील बऱ्याच आजारांना स्वीकारायला तयार होऊन रोगमुक्त किंवा मनातील विचारांना यश देताना दिसते. ही एक भावना शक्ती विश्वास आणि दृढता म्हणजे सकारात्मक दैविक आराधना केल्यास जीव घेण्या परिस्थितीतून आपण जीवदान मिळवू शकतो . त्याला आपण *देव तारी त्याला कोण मारी* असे म्हणतो. आयुष्य मर्यादा ही जरी अल्पकाळ असली तरी अध्यात्मामुळे आपण दीर्घकाळ जीवन जगू शकतो. हे एक मेडिकल सायन्स प्रमाणे शास्त्र आहे. पण यातही कधी कधी
*मानले तर देव ! नाहीतर दानव !!
काही संशोधनातून आपले श्रद्धा आणि आपल्या कल्याणकारी भावनेमध्ये फार संबंध आहे. धर्म. ध्यान. आणि प्रार्थनेतून मिळणारे श्रद्धांजली आणि शक्ती आरोग्यास नेहमी हातभार लावतोय त्यात उपचारांनाही प्रोत्साहन देते ही एक अध्यात्मिक दैविक शक्ती असल्याने पुष्कळ आजारी औषधापेक्षा अध्यात्माने शंभर टक्के माणूस निरोगी होऊन रोग समूळ नष्ट झाल्याच्या घटना आपण ऐकतो म्हणून अध्यात्म आणि आरोग्य या रोग निवारण करणारे एक उपचार पद्धती आहे.
अध्यात्मिक शक्ती हीच मानवी जीवनाला अर्थपूर्ण दृष्टिकोन देऊ शकते. तेथे डॉक्टर वैद्य यांचाही उपचार कमी पडतो येथे नैसर्गिक अध्यात्म हा मानवाला तारुण पुढील जीवन जगण्याचे शिकवतो. खरं म्हणजे प्रत्येक धर्मात आणि जातीमध्ये वेगवेगळे आध्यात्मिक ग्रंथ उदाहरणार्थ गीता. रामायण. महाभारत. ज्ञानेश्वरी. कबीर दोहे. दासबोध. स्वाध्याय निरंकारी पंत . निर्मला माता. प्रजापिता ब्रह्मकुमारी. इत्यादी वांडग्मयामध्ये मानवाच्या जीवनातील सुविचार सुपंथ सदाचार आणि एकमेकांच्या सहवासात समुदायाची अधिकाधिक जोडणारे संबंध प्रस्थापित करून माणसाने प्रगती कशी करावी हेच सकारात्मक दृष्टिकोन दर्शविला आहे त्यामुळे आज आपण सामाजिक आधार घेऊन एकमेकांशी आपोआप जुळतो त्यामुळे सर्वसाधारण समाजात कंपनीत नोकरीच्या ठिकाणी जवळ येऊन सलोखा निर्माण करतो . त्यामुळे माणूस एकटेपणाची भावना कमी करून आपल्यातील परकेपणा नष्ट करतो आम्ही एक आहोत .एक राहणार .एक वचन अध्यात्मामुळे मिळते. त्यामुळे जीवनातील व्यसन उदाहरणार्थ दारू बिडी सिगरेट बंद होऊन माणूस मांसाहारी चिकन मटन खाणे बंद करतो.
अध्यात्मिक आजाराची लक्षणे
अनेकदा आपल्या जीवनात आपण सर्व गुण संपन्न असलो तरी काही गोष्टी मनातील नैराश्य. उदासीनता. आणि ताण तणाव. आळस हे शरीरातील चैतन्य शक्ती मध्ये बिघाड निर्माण झाल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आजार निर्माण होतात. त्यामुळे कारणाशिवाय तयार होणारी शक्ती ऊर्जा त्यातील उत्साहाचा कमीपणा हा भावनिक आजार निर्माण करतात. अशावेळी डॉक्टर किंवा वैद्य बरेच उपचार करतात पण माणसाला यश मिळत नाही. जर स्त्री पुरुषांना आपल्या कर्म आणि कर्तव्याचा विषय समजून सांगितला म्हणजेच पुनरुत्पादन होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज असते. याच्यातील शारीरिक संबंधांची माहिती तंतोतंत देऊन अध्यात्मिक शक्तीचा पाठपुरावा केला तर नैसर्गिक गर्भधारणा आपोआप होऊ शकते. ही एक शक्ती आणि ऊर्जा त्यातील उत्साहाचा उत्कलन बिंदू तयार करते. हा आपणास जास्त काळ टिकवणारा भाग अध्यात्मामुळे निर्माण करता येतो त्यासाठी सकारात्मक जीवन महत्त्वाचे असते.
कधी अचानक पोटाच्या समस्या. स्नायूना होणारा ताण . डोकेदुखी. ऍसिडिटी. गॅस्ट्रिक ट्रबल. बद्धकोष्ठता यासारखी आजार शरीरात निर्माण होतात याला कारण ही मनाची नकारात्मक भूमिका आहे . म्हणजेच ताण-तणाव वैचारिक जीवन हे होय. याला असमाधान असे म्हणतात त्यामुळे मानसिक आरोग्यामध्ये अध्यात्माचा फार मोठा मोलाचा भाग आहे.
आजारपणा त कधीही अध्यात्माचे अर्थात दैविक उपासनेचा फार मोठा सहभाग असतो. बऱ्याच व्यक्तींना याचा नेहमी अनुभव येत असतो. त्यातही काही व्यक्ती नास्तिक असतात. त्यांना या गोष्टीवर विश्वास नसतो. पण अध्यात्म हे एक शास्त्र आहे.
यामुळे जीवनात कोणतीही गोष्ट सहज साध्य होते. माणसाचा स्वभाव बदलून आचार विचार बदलतात . तो सकारात्मक स्वतःशी वागतो आणि जीवनात यशस्वी होतो.
आजही विज्ञान हे शाप की वरदान हेच आपणास कळत नाही. विज्ञानात अध्यात्म हा एक भाग असतो. त्यामुळे आज इस्रोमध्येही चंद्रावर मंगळावर यान सोडताना शुभ मुहूर्त बघूनच आकाशात भ्रमण केले जाते. आपण कोणतीही पूजाअर्चा करताना श्री गणेश यांना वंदन करून किंवा श्री सत्यनारायण पूजा करून भूमिपूजन किंवा शुभ कामाला सुरुवात करतो त्यामुळे आपल्याला समाधान आणि आनंद मिळतो. त्यामुळे अध्यात्म आणि आजार या एकाच नानाच्या दोन बाजू आहेत.
Tags:
आरोग्य