शुभांगी ताई पाटील यांच्याकडून शिक्षक भावांना एक लाख राख्या पाठवुन अनोखे रक्षाबंधन साजरे

.   धुळे सत्यप्रकाश न्युज 
    शिवसेनेच्या राज्य उपनेत्या तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्या तर्फे राज्यातील शिक्षकांना रक्षाबंधनानिमित्त एक लाख राख्या पाठवण्यात आल्या. शिक्षक हा समाजातील एक महत्त्वाचा घटक असून तो समाजाला दिशा देण्याचे काम करतो व आपल्या पुढील पिढ्या घडवण्याचे काम करतो जर समाजात शिक्षक नसला तर सुसंस्कृत समाजाची निर्मिती होणे शक्य नाही. पूर्वीच्या काळी समाजात शिक्षकांना खूप मान सन्मान होता अनेक देशांमध्ये शिक्षकी पेशा डॉक्टर ,इंजिनिअर, वकील याहीपेक्षा  वरचा समजला जातो. परंतु आपल्या देशात सध्या शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे समाजामध्ये शिक्षकांची प्रतिमा मलीन करण्याचे काम केले जात आहे शिक्षकांवर सरकारकडून प्रचंड शालाबाह्य कामांचा बोजा देऊन त्यांना त्यांच्या कर्तव्य पथापासून दूर नेले जाते व त्यानंतर शिक्षकांना काही काम नसते असे सांगून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम जाणून-बुजून करण्यात येत आहे.त्यामुळे शिक्षकांप्रती समाजात विशेषतः महिलांमध्ये कृतज्ञता निर्माण व्हावी या उद्देशाने शिवसेनेचा राज्य उपनेते तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्यातर्फे दरवर्षी राज्यातील शिक्षकांना रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठवण्यात येतात या राख्यांसोबत शुभांगी ताई पाटील यांच्या स्व हस्ताक्षरात स्वाक्षरी केलेले शुभेच्छापत्र  देण्यात येते. राज्यातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांपर्यंत प्रत्यक्ष राख्या पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे यामध्ये मोलाचे सहकार्य असते. संघटनेचे प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी स्वतः शाळांवर जाऊन शिक्षकांपर्यंत राख्या व शुभांगी ताई यांचा शुभेच्छा संदेश पोहोचवतात. 
याही वर्षी शुभांगी ताई पाटील यांच्यातर्फे विभागातील सुमारे एक लाख शिक्षकांपर्यंत राख्या व शुभेच्छा संदेश असलेले पत्र विविध शाळांवर पाठवण्यात आले. एक आगळावेगळा उपक्रम म्हणून शिक्षकांमधून शुभांगी पाटील यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post