येथील श्रावण शुद्ध द्वादशी श्री गणपति मंदिर वर्धापन दिनानिमित्त सकाळ पासून सुशोभित केलेल्या आपल्या आराध्य दैवत गणेशाचे दर्शन करण्यासाठी भक्तांनी गर्दि केली होती
आज वर्धापनदिन दिनानिमित्त सकाळी 8 ते 11 सहस्त्रावर्तन सकाळी 11.30 ते 1 श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.या सर्व कार्यक्रमात शहरातील गणेश भक्तांनी हजेरी लावली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश पाटील, सतीशभाई शाह, सतीश लाड, शिरिषभाई शाह,भरत गावीत,भरत पाटील, पुजारी अजित पाथरकर, तुळशीराम गुरव सह गणेश भक्तांनी परिश्रम घेतले.
Tags:
धार्मिक