A.T.M. मशिन फोडुन चोरी करण्याचा प्रयत्न करणारे 4 इसम व 2 विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात नवापुर पोलीसांची कारवाई.

            नवापूर सत्यप्रकाश न्युज 
     येथील हनुमान मंदिर जवळिल A.T.M. मशिन फोडुन चोरी करण्याचा प्रयत्न करणारे 4 इसम व 2 विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात नवापुर पोलीसांनी घेतली असून पुढील कारवाई करण्यात आली आहे. 
     सविस्तर वृत्त असे की नवापूर पोलीस ठाणे गु.र.नं. 464 / 2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2), 334 (1), 62, अन्वये दिनांक 7/8/2025 रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील फियांदी अतुल प्रल्हादराव देबाजे वय 37 वर्षे, धंदा नोकरी शाखाधिकारी, नेमणुक भारतीय स्टेट बैंक, मुख्य शाखा नवापूर, ता. नवापूर, जि. नंदुरबार यांनी फिर्याद दिली की, दिनांक 7/8/2025 रोजी रोजी रात्री 01:50 ते 02:00 वाजेचे दरम्यान नवापुर शहरातील महात्मा गांधी पुतळ्याचे जवळ मंगेश गंगाधर येवले यांचे मालकीचे भाडयाने घेण्यात आलेल्या गाळामध्ये बसविण्यात आलेले भारतीय स्टेट बँकेचे A.T.M मशिन नंबर SIBN00H62008 (A.T.M No. 8) मध्ये सुरक्षीत ठेवण्यात आलेली रोख रक्कम ही कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करण्याचे उद्देशाने कोणत्यातरी हत्याराने A.T.M मशिन हे फोडून रोख रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिलेल्या प्रथम खबर वरुन वर प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
     आज दिनांक 7/8/2025 रोजी नवापुर पोलीस ठाणे येथील रात्रगस्तचे पोलीस अंमलदार हे सतर्कपणे नवापुर शहरात रात्रगस्त करीत नवापुर शहरातील महात्मा गांधी पुतळ्याचे जवळ आले असता पोलीसांची चाहुल लागताच तेथे जवळ असलेले A.T.M मधून काही इसम हे पळत असतांना व दिसुन आले. त्यांचा पाठलाग करता ते गल्ली बोळाचा फायदा घेवुन फरार झाले. पोलीसांनी सदर A.T.M मध्ये जावुन पाहता तेथील A.T.M मशिन हे खाली पडलेले, त्याचे पुढील बाजुस असलेला लहान दरवाजा हा तोडुन उघडलेला व सेंसर वायरी तोडलेल्या दिसल्या. त्यानंतर नवापुर पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार असे घटनास्थळी हजर झाले. सदर ठिकाणी तात्काळ फॉरेन्सीक पोलीस व्हॅन व इतर तज्ञ यांना बोलावून घेण्यात आले. त्यानंतर त्यांनी आरोपी शोधकामी अधिकारी व अंमलदार यांचे मार्फतीने सदर घटनास्थळाचे पासुन आरोपी यांचा येण्याचा व जाण्याचा मार्गावरील सर्व रस्त्यावरील सी.सी.टी.व्ही. कैमेरांची पाहणी करुन सदर जाण्याचा मार्ग निश्चित करुन त्या दिशेने तपासाची सूत्रे वळविली. आरोपीतांचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गुप्त बातमीदार यांचेमार्फत काही संशयीत व्यक्तीचे घटनेचे वेळी झालेल्या हालचाली बाबत माहिती मिळाली. एकंदरीत प्राप्त गोपनिय माहिती व तांत्रिक विष्लेषनाअंती सदरचा गुन्हा हा 1) सुमितभाई दानियलभाई गामीत वय 18 वर्षे, 7 महिने, 2) जस्टीनकुमार दिलीपभाई गामीत वय 18 वर्षे, 8 महिने, दोन्ही राहणार भित खुर्द, ता. उच्छल, जि. तापी, राज्य गुजरात, 3) जतीन मोना गामीत वय 19 वर्षे, । महिना, 4) गणेशभाई जिवन गामीत वय 19 वर्षे, 9 महिने, दोन्ही राहणार रावजोबुधा, ता. उच्छल, जि. तापी, राज्य गुजरात, 5) विधी संघर्षग्रस्त बालक (अ.व.क. नांव गोपनिय ) राहणार भिंत खुर्द, ता. उच्छल, जि. तापी, राज्य गुजरात, 6) विधी संघर्षग्रस्त बालक (क. ख. ग. नांव गोपनिय राहणार रावजीबुंचा, ता. उच्छल, जि. तापी, राज्य गुजरात यांनी संगनमत करुन सदर A.T.M. मशिन फोडून रोख रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे निष्पन्न झाले.
  त्या अनुषंगाने पोलीस पथकाने वर नमुद आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालक यांचा मिळालेल्या गोपनिय बातमीच्या अनुषंगाने नमुद आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने त्यांना सखोल विचारपूस करता त्यांनी संगनमत करुन सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले असून त्यांनी A.T.M. मशिन फोडणे करीता वापरलेले साहीत्य लोखंडी विळा, दोन मोटार सायकली असा मुद्देमाल हा काढून दिल्याने जप्त करण्यात आला असून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
    सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली नवापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, जितेंद्र महाजन, भाऊसाहेब लांडगे, पोलीस हवालदार किशोर वळवी, राजधर जगदाळे, मोहन शिरसाठ, दिनेशकुमार वसूले, संजय रामोळे, पोलीस नाईक सुरेंद्र पवार, पोलीस शिपाई किशोर वळवी, अतुल पानपाटील, दिनकर चव्हाण, रविंद्र भोई, समाधान केंद्रे, अमृत पाटील, नेहरु कोकणी, प्रमोद गुजर, प्रकाश कोकणी, फरिन्सीक कनिष्ठ तज्ञ स्वप्निल वाळके, संजय रामोळे, पुरुषोत्तम साठे यांच्या पथकाने केली असून वरिष्ठांचे मार्गदर्शना नुसार सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे हे करीत आहेत.
  तरी नवापुर शहरातील सर्व नागरीक यांना कळविण्यात येते की, त्यांचे स्वतःचे राहते घरातील किमतो वस्तु व बाहेर उभे केलेल मोटार सायकलचे सुरक्षिततेचे दृष्ट्रीने रस्त्याने येणारे जाणारे इसम दिसतील अशा दिशेने सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसवुन घ्यावे करीता जाहिर आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post