महसूल सप्ताह तसेच ग्रामसंवाद अभियान अंतर्गत आज नवापुर तालुक्यातील मौजे बोरझर येथे मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच सर्व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी स्थानिक पदाधिकारी व नागरिक यांचे उपस्थितीत कॅम्प घेणेत आला.
यावेळी बोरझर व परिसरातील नागरिक यांचे शासकीय स्तरावरील कामकाज व समस्या याबाबत माहिती घेऊन चर्चा करण्यात आली.
नागरिकांनी रस्ते, वीज, फॉरेस्ट JJM मिशन, Aegristack इत्यादी विविध विषयांवर चर्चा करत माहिती देण्यात आली.
दुर्गम भागात कॅम्प आयोजित करून समस्यांबाबत माहिती घेऊन कार्यवाहीबाबत सुचना दिल्याबद्दल उपस्थिती पदाधिकाऱ्यांसह नागरिक यांनी समाधान व्यक्त केले.तसेच JJM कामकाज व प्रतापपुर प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी करण्यात आली.
अंजली शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी नंदुरबार, दत्ता जाधव, तहसीलदार नवापुर
देवीदास देवरे, गटविकास अधिकारी
श्री शेख महावितरण. अक्षय गावीत, क. अभियंता . श्री सरगर , मंडळ अधिकारी
रिबेन गावीत, देविदास गावीत तलाठी आदिंसह बोरझर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags:
शासकीय