ना.दादाजी भुसे सोबत शिक्षक आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक व पदवीधर आमदारांची बैठक संपन्न

मुंबई सत्यप्रकाश न्युज 
     आज शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री ना. श्री. दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्व  शिक्षक व पदवीधर  आमदारांची बैठक झाली, बैठकीसाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार विक्रम काळे, आमदार ज मो. अभ्यंकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार जयंत असगावकर, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सतीश चव्हाण,  आमदार सत्यजित तांबे,आमदार राजेश राठोड उपस्थित होते, खालील विषयांवर चर्चा करून निर्णय झाला
1) दिनांक 15 मार्च 2024  संच मान्यता निकषा बाबत कोर्टामध्ये प्रकरण   न्याय प्रविष्ट असल्याने  कोणताच निर्णय घेता येत नाही. जैसे थे परिस्थिती राहील.*
2) अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया  शेवटच्या टप्प्यामध्ये  सर्वांना ओपन प्रवेश केलेले आहेत, फक्त विद्यार्थ्यांनी  त्या कॉलेजचे नाव  प्रथम स्थानी नोंदवणे, त्याकरता फॉर्म  नव्याने भरणे आवश्यक आहे.
3) टप्पा वाढ चा शासन आदेश  काम सुरू आहे  दोन दिवसांमध्ये  आदेश येईल असे प्रधान सचिवांनी सांगितले.
   30 दिवसात त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना  मानिव टप्पा वाढ मिळावा,सर्व आमदारांनी आग्रह धरला, कशाप्रकारे प्रोसेस करता येईल  ते पाहतो असे मंत्रिमहोदयांनी सांगितले
4) शेवटच्या वर्गाची पटसंख्या अभावी अनुदानापासून   शाळांची माहिती आयुक्तांनी पाठवावी  असे मंत्री महोदयांनी सांगितले* 
5) ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जन्म दाखल्या अभावी काढता येत नाही,  त्यांनी तहसीलदार करून पडताळणी करून घ्यावी  व तसा दाखला  आधार सेंटरला द्यावा. आधार कार्ड काढता येईल* 
      तसेच अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली  सभेस   सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त सचिनंद्रसिंह  प्रताप, प्राथमिक संचालक शरद गोसावी, उपसचिव  तुषार महाजन, उपसचिव कवळे साहेब  उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post