महाराष्ट्र राज्यातील विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षकांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा म्हणून आषाढी एकादशीच्या दरम्यान कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी अनुदान मिळावे म्हणून पांडुरंगाला साकडे घातले होते व नवस केला होता तो नवस फेडण्यासाठी अंशतः अनुदानित शिक्षकांसोबत आज पंढरपुरात जाऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन नवस फेडला, पंढरपूरच्या राज्य परिषद सदस्य व मंदिराच्या ट्रस्टी श्रीमती शकुंतला नडगिरी यांच्यावतीने आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांना मंदिरात सन्मानित करण्यात आले, तसेच कान्होपात्रा या दुर्मिळ वृक्षाचे रोपण करून पूजा करण्याची भाग्य लाभले
सोबत सुनील भाऊ जगताप, श्री दौलत भावार्थे, अनिल शिंदे, शैलेश गोल्हे, अरुण घोडविंदे उपस्थित होते
Tags:
धार्मिक