येथील श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए. एम. व्होरा कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे जागतिक आदिवासी दिन व क्रांतिदिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी शाळेत आदिवासींची कुलस्वामिनी याहा मोगी माता व क्रांती वीर धरती आबा भगवान बिरसा मुंडा, ख्वाज्या नाईक, तंट्या भिल यांच्या प्रतिमेला कार्यक्रमांचे अध्यक्ष मुख्याध्यापक मिलिंद वाघ, उपमुख्याध्यापक नारायण मराठे, पर्यवेक्षक दीपक मंडलिक, गणेश महाजन, कनिष्ठ महाविद्यालयीन विभागच्या प्रमुख श्रीमती मेघा पाटील, नरेश जयस्वाल, मिनाक्षी गावीत, निंबुदास गावीत, सोनु गावीत, मंजुषा वसावे, दीपमाला गावीत, जयश्री चव्हाण, कर्नलकुमार वसावे, भरत सैंदाणे, शिक्षकेतर कर्मचारी संजू मावची, संजू वसावा, नितेश गावीत आणि इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी सर्व आदिवासी बांधव, शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना मिलिंद वाघ म्हणाले की, आपल्या संस्कृतीचे जतन करत विकास करावा. आजच्या दिवशी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या महापुरुषांचे स्मरण करून त्यांचे त्याग व बलिदान लक्षात घेऊन जीवनोद्धार करावा असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ शिक्षक निंबुदास गावीत, सूत्रसंचालन मंजुषा वसावे, यांनी तर आभार शर्मिला गावीत यांनी मानले.
शाळेतील इतर सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी यांनी या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहुन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
Tags:
शैक्षणिक