येथील श्रीमती. प्र.अ. सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व ए. एम.व्होरा कनिष्ठ
महाविद्यालय नवापूर येथे नाशिकच्या एलेन क्लासेस मार्फत इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जेईई व नीट या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले. या मार्गदर्शन वर्गासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून एलेन क्लासेसचे पंकज जयस्वाल सर व सचिन आहेर सर उपस्थित होते. मार्गदर्शन सत्राचा सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेचे उपमुख्याध्यापक नारायण मराठे व पर्यवेक्षक दीपक मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले. या मार्गदर्शन सत्रात प्रमुख मार्गदर्शक . सचिन आहेर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, परीक्षेची रचना, अभ्यासाचे नियोजन, वेळ व्यवस्थापन तसेच गणित, विज्ञान व तर्कशक्ती वाढवण्याच्या विविध युक्त्यां बद्दल माहिती दिली. "योग्य नियोजन सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास हे यशाचे प्रमुख मंत्र आहेत" असे मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांना नीट व जेईई या परीक्षांचे स्वरूप कळावे, शालेय जीवना पासूनच या परिक्षेचा सराव व्हावा या उद्देशाने ऐलन मार्फत शाळेत दरवर्षी टॅलेंट एक्स परीक्षा घेतली जाते व या परीक्षेचे समन्वयक म्हणून दर्शन अग्रवाल सर काम पाहतात.या मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद वाघ , उपमुख्याध्यापक नारायण मराठे , पर्यवेक्षक दीपक मंडलिक , गणेश महाजन पर्यवेक्षिका मेघा पाटील , तसेच शाळेचे ज्येष्ठ शिक्षकवृंद भरत सैंदाणे , योगिता पाटील , मीनल पाटील उपस्थित होते.या मार्गदर्शन वर्गाचे सूत्रसंचालन कर्नल वसावे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन दर्शन अग्रवाल यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या मार्गदर्शन वर्गात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
Tags:
शैक्षणिक