आज भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील ७९ रेशन दुकानांमध्ये मिनी "बैंक सुविधा सुरू करण्यात आली आहे. विशेषतः जिल्ह्यात ज्या भागात बँकांच्या शाखा कमी आहेत किंवा नाहीतच अशा भागात हा प्रयोग राबविण्यात आला आहे.
ग्रामीण भागात अनेकदा प्राथमिक किंग सुविधा सहज उपलब्ध नसतात. उगरिकांना लांबच्या शहरात जाऊन व्यवहार करावे लागतात, त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढतात. समस्येवर उपाय म्हणून जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा अग्रणी क आणि एअरटेल पेमेंट बैंक यांच्या बहकार्याने 'मिनी बैंक' ही योजना सुरु करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसेच बातपुड्यातील दुर्गम भागात अनेक काणी बँकांच्या शाखा नाहीत. त्यामुळे ागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. शिवाय जवळच्या गावातील "जरी जायचे म्हटले तर पूर्ण दिवस वाया जातो. ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी "मित्ताली सेठी यांनी ग्रामीण भागात बैकांच्या शाखा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत रेशन दुकानांमध्ये मिनी बैंक सुरू करून त्याद्वारे किमान पैसे काढणे, जमा करणे असे व्यवहार करता येतील, या दृष्टीने प्रयत्न करण्यात आला नाहे. त्याची सुरुवात स्वातंत्र्यदिनाच्या पर्भूमीवर करण्यात आली असून, देशाच्या ७९ वा स्वातंत्र्यदिन आणि ७९ ठिकाणी शाखा सुरू होत आहेत. आता शिघा कानच आपल्या गावातील बैंक बनणार नाहे. सुरक्षित व्यवहार, कमी वेळेत सेवा नाणि सरकारी लाभ थेट खात्यात या योजनेमुळे ग्रामीण नागरिकांचे जीवन अधिक सुलभ आणि सक्षम होणार आहे.
मिनी बँकेतील सुविधा...
ग्राहकास रोख रक्कम काढता येणार आहे. पैसे जमा करता येणार असून, नवीन बैंक खातेदेखील उघडता येणार आहे. डीबीटीसाठी बैंक खाते लिंक करता येणार असून, मोबाइल रिचार्ज, डीटीएचसेवा रिचार्ज करता येतील. एटीएम कार्डचा वापर करता येऊन पीन जनरेशन करता येईल. जीवन, आरोग्य व अपघाती विमा नोंदणी, फास्ट टॅग खरेदी व खाते उघडणे आणि कर्जासाठी प्राथमिक अर्ज व मार्गदर्शन करता येईल.
गावमध्येच बैंकिंग सेवा उपलब्ध होणार, प्रामाणिक आणि सुरक्षित व्यवहार करता येईल. महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी सोयीस्कर डिजिटल व्यवहाराची सवय लागते, ज्यामुळे आर्थिक व्यवहार पारदर्शक होतात.
नंदुरबार जिल्ह्यातील एकूण १०८१ रास्तभाव दुकाने आहेत. यापैकी उर्वरित १००२ दुकानांमध्येही टप्याटप्प्याने मिनी बैंक सुविधा सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच पुढील टप्यात सेवा गुणवत्तेत सुधारणा, दुकानदारांचे प्रशिक्षण आणि जनजागृती मोहिमा राबवण्यात येतील.
रेशन दुकानांमध्ये अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारा नंदुरबार जिल्हा पहिला ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी विविध घटकांची मदत घेतली जात आहे. हा प्रयोग वा ७९ गावांमध्ये यशस्वी झाल्यास इतर रेशन दुकानांमध्येही ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. यामुळे रेशन दुकानचालकांनाही कमिशनच्या स्वरुपात उत्पन्न मिळणार आहे.
Tags:
सामाजिक