नंदुरबार(सत्यप्रकाश न्युज):-
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील कुकराण गावाच्या वनक्षेत्रात, जमिनीच्या हक्कासंबंधीचे चतुर सीमा एकत्रितरण व आकारबंद अशा दस्तऐवजांच्या नकला काढून देण्याच्या मोबदल्यात, एक हजार रुपयाची मागणी करणाऱ्या शिपायाला नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून रंगेहाथ आठशे रुपयांची लाच घेताना नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई राजेंद्र अरविंद पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील कुकरान येथील तक्रारदार यांनी नवापूर तालुक्यातील कोकण परिसरात असलेल्या शेत जमिनीची का संबंधीचे चतुर सीमा एकत्रिकरण व आकार बंद अशा दस्तऐवजांच्या नकला काढून देण्याच्या मोबदल्यात नवापूर भूमि अभिलेख कार्यालयातील शिपाई राजेंद्र अरविंद पाटील यांनी संबंधित तक्रारदार यांच्याकडून 1000 रुपयाच्या लाचेची मागणी केली त्या अनुषंगाने 13 ऑगस्ट 2025 रोजी पडताळणी केल्यानंतर आठशे रुपये देण्याचे मान्य केले त्यानुसार 19 ऑगस्ट 2025 रोजी नवापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या परिसरात आठशे रुपयांची लाच स्वीकारताना नंदुरबार लाच लचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले असून, सदरची कारवाई नाशिक लातूर प्रतिबंधक परिक्षेत्र विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांडगे तसेच नाशिक परिक्षेत्र विभागाचे प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, नंदुरबार लाच लचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रशांत भरते व त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील हेड कॉन्स्टेबल विजय ठाकरे, हेड कॉन्स्टेबल हेमंतकुमार महाले, हेड कॉन्स्टेबल जितेंद्र महाले, पोलीस नाईक सुभाष पावरा यांनी सदरची कारवाई केली आहे.
Tags:
गुन्ह / अपराध