दि. नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित, दि. एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे. शाह कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर येथे सद्भावना दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परीख यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी पर्यवेक्षक फारुख पटेल व पर्यवेक्षिका श्रीमती निर्जलाबेन सोनवणे उपस्थित होते.
सुरुवातीला विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत केले. शाळेचे उपशिक्षक विपुल प्रजापत यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली व शब्द सुमानांनी स्वागत केले. त्यानंतर माता सरस्वती व स्वर्गीय भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यानंतर जितेंद्र जगताप यांनी सद्भावना दिनाची प्रस्तावना सादर करत विद्यार्थ्यांना सद्भावना दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर राजीव गांधी यांच्या जीवनावर आधारित व्हिडिओ डॉक्युमेंट्री प्रदर्शित करण्यात आली. तसेच इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थिनींनी ‘सर्वधर्मसमभाव’ या संकल्पनेवर आधारित मनमोहक मुकनाटिका सादर केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात श्रीमती कमलबेन परीख यांनी विद्यार्थ्यांना सद्भावनेचे महत्त्व पटवून दिले व राजीव गांधी यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विपुल प्रजापत यांनी केले तर नैनेश पंचोली यांनी आभार प्रदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री संजयकुमार जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे उपशिक्षक जितेंद्र जगताप, मुरारीलाल अहिर, नैनेश पंचोली, विपुल प्रजापत, महेश सेनमा, निलेश गावंडे व श्रीकांत पाटील यांनी परिश्रम घेतले.
Tags:
शैक्षणिक