नवापूर सत्यप्रकाश न्युज
येथील माजी समाजध्यक्ष भिकनशेठ ब्रह्मे यांचे पुत्र व प्रविण ब्रह्मे यांचे लहान भाऊ अरविंद भिकन ब्रह्मे यांचे गेल्या 12 दिवसापूर्वी आकस्मिक निधन झाले ब्रह्मे परिवारात झालेली हि घटना आतिशय दुर्दैवी होती कारण अत्यंत लहान वयात अरविंद गेल्याने त्याचा चिमुकल्याच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपले.
परतु समाजाचे एक देणे म्हणून शहरातील प्रतिष्ठीत असलेले खैरनार ईलेक्ट्रिक चे मालक कृष्णा खैरनार यांनी अतिशय परिश्रमी असलेल्या स्व. अरविंद ब्रहमेच्या चिमुकल्या मुलांच्या शिक्षणासाठी 11000 रुपयाची मदत केली असुन कृष्णा खैरनार यांचा दातृत्वाचे समाजात कौतुक होत आहे.
स्व. अरविंद ब्रह्मे हा अतिशय परिश्रमी व मेहनती कार्यकर्ता होता समाजातील प्रत्येक कार्यक्रमात हिरारीने सहभाग घेणारा युवक होता त्याने काहि वर्षापूर्वी शहरातील प्रतिष्ठित असलेला श्री बाबा गणेश मडळाच्या अध्यक्ष पदाची अत्यंत जवाबदारीने चोखपणे पार पाडली होती व कौतुकास्पद कार्य केले होते.
ऐन गणेश उत्सवात अरविंद चे निधन झाल्याने त्याची पोकळि हि कधी न पूर्ण होणारी असुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Tags:
सामाजिक