राज्यातील विशेष शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयने रिट याचिका क्रमांक 132/ 2016 नुसार दिलेल्या निर्देशानुसार व शासनाच्या नियमानुसार सेवाज्येष्ठते प्रमाणे समायोजन करण्यात यावे या मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील विशेष शिक्षक काल दिनांक २०ऑगस्ट २०२५ पासून धुळे येथील जेल रोड क्यू माईन क्लब समोर बेमुदत उपोषणाला बसलेले होते. आपल्याच जिल्ह्यातील शिक्षकांना अशा प्रकारे उपोषणाला बसण्याची वेळ येत असल्याचे पाहून तात्काळ या आंदोलनाची दखल घेत शिवसेनेचा राज्य उपनेत्या तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्ष शिक्षक नेत्या शुभांगी ताई पाटील यांनी काल तात्काळ आंदोलन स्थळी भेट देत या शिक्षकांच्या व्यथा समजून घेतल्या व राज्याचे शिक्षण संचालक मा. शरद गोसावी साहेब यांच्याशी तात्काळ भ्रमणध्वनी वरून संपर्क साधत या शिक्षकांचे समायोजन नियमानुसार व्हावे यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद धुळे यांना निर्देश देण्याची मागणी केली. तसेच आज पुन्हा दिनांक 21 /8 /2025 रोजी शुभांगी ताई पाटील तसेच, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल भाऊ सोनवणे , प्रवीण बाविस्कर सर, ऍड विवेक सूर्यवंशी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शेख साहेब यांची भेट घेऊन या शिक्षकांच्या आंदोलनाची तात्काळ दखल घेत आजच शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करून शिक्षकांची समायोजनाची यादी जाहीर करावी यासाठी निवेदन दिले व याबाबत सविस्तर चर्चा करत या शिक्षकांवर कोणत्याही प्रकारे अन्याय न होता मा न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासनाच्या नियमानुसार शिक्षकांचे समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी अशी आग्रही मागणी केली.
शुभांगी ताई पाटील यांच्या या मागणीची दखल घेत म. मुख्य कार्यकारी अधिकारी सो जिल्हा परिषद धुळे यांनी तात्काळ दखल घेत आज सायंकाळी जिल्ह्यातील विशेष शिक्षकांची समायोजनाची यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे या शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुभांगी ताई पाटील यांनी विशेष शिक्षकां साठी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल शिक्षकांनी शुभांगी ताई पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल भाऊ सोनवणे व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
Tags:
शैक्षणिक