श्रीमती प्र अ सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर येथे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, नवापूर यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी एड्स या विषयावर जिल्हा रुग्णालयातील एड्स विभागाचे समुपदेशक कैलास माळी यांच्यातर्फे मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद वाघ, उपमुख्याध्यापक नारायण मराठे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख मेघा पाटील, माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक दीपक मंडलिक, वरिष्ठ शिक्षिका जयश्री चव्हाण, गणेश लोहार, टी आर जाधव, सी एस पाटील, कविता खैरनार, महेंद्र सोनवणे, दिनेश खैरनार, डी डी गावित, पी सी पाटील आदी शिक्षक बंधू भगिनी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मेघा पाटील यांनी एड्स या विषयाचे गांभीर्य विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना या विषयाची अधिक माहिती व्हावी या उद्दिष्टाने या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कैलास माळी यांनी विद्यार्थ्यांना एड्स या आजाराची सखोल माहिती दिली. एड्स हा अतिशय भयंकर आजार असून याविषयी विद्यार्थ्यांनी जागरूक असणे आवश्यक आहे. एड्स या आजाराने रोग प्रतिकारशक्ती कमी होऊन एड्स बाधित व्यक्तीच्या जीवनाला धोका असतो. एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी वजन कमी होणे, खोकला, जुलाब होणे यासारखे लक्षण आढळून येतात. यावर उपाय म्हणून तात्काळ रक्त तपासून घेणे, लसी घेणे, व त्यावर योग्य ते उपचार घेऊन आजाराचे निदान करणे आवश्यक आहे हे मार्गदर्शनातून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एस खैरनार यांनी तर आभार प्रदर्शन डी एम खैरनार यांनी केले.
Tags:
शैक्षणिक