जिल्हयातील आगामी गणेशोत्सव, ईद ए मिलाद हे महत्वाचे सण शांततेत पार पडून सर्वत्र कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून प्रत्येकाला आपला सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. श्री. दत्तात्रय कराळे यांचे विशेष उपस्थितीत पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथे दि. 20/08/2025 रोजी सायंकाळी 05.30 वाजता शांतता समिती तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी व सदस्य यांचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत शांतता समितीचे 120 ते 150 सदस्य तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विशेषतः आगामी सण उत्सव त्यामध्ये गणेशोत्सव व ईद ए मिलादचे अनुषंगाने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजने संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांचे पाल्यांनी विविध क्षेत्र जसे शिक्षण, खेळ, कला, स्पर्धा परिक्षा इत्यादीमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केल्याने त्यांचा यावेळी गौरव सोहळा कार्यक्रम पार पडला. यामध्ये खालील पोलीस पाल्यांचा गौरव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे हस्ते करण्यात आला. खालील पोलीस पाल्यांचा गौरव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे हस्ते करण्यात आला,
1) चि. कुणाल पंकज बडगुजर, वय 16 वर्षे, इयत्ता 10 वी 2) कु. आयुशी नरेंद्र नाईक, वय 16 वर्षे, इयत्ता- 10 वी 3) ज्ञानेश्वरी रविंद्र कोराळे, वय-17 वर्षे, इयत्ता 10 वी 4) कु. कावेरी रमेश साळुंके, वय-16 वर्षे, इयत्ता 10 वी 5) चि. मंथन राजेश अहिरराव, वय 16 वर्षे, इयत्ता 10 वी 6) चि. ऋषिकेश विवेक पाटील, वय-13 वर्षे, इयत्ता 07 वी
7) कु.रेणुका प्रकाश गावीत, वय 26 वर्षे, एम.बी.बी.एस 8) चि.सुमित हिम्मत निकुम, वय 18 वर्षे, B.Sc. Agriculture 9) कु. हिताक्षी सुभाष तमखाने, वय-13 वर्षे, शिक्षण- 7 वी 10) चि. रोहित संजय चौधरी, वय- 20 वर्षे, M.Sc 11) चि. देव महेंद्र चव्हाण, वय 22, वर्षे, बी.ए. (अॅपीयर) 12) चि. रोहित महेंद्र चव्हाण, वय-27 वर्षे, (एम.ए.) 13) कु. रुथिका सुनिल मोरे वय 18 वर्षे, शिक्षण 12 वी
14) चि. हर्षल सुहास वळवी, वय-16 वर्षे, इयत्ता-10 वी 15) चि. चैतन्य कपिल बोरसे, वय- 15 वर्षे, इयत्ता- 09 वी 16) चि. हंसराज रविंद्र जाधव,
वय- 16 वर्ष, इयत्ता- 10 वी 17) चि. मोहित अशोक वारुडे, वय 16 वर्षे, इयत्ता 10 वी 18) कु. अदविका सुनिल मोरे, वय- 10 वर्षे, शिक्षण 5 वी (19) कु.सार्थक उत्तमकुमार मिस्त्री, वय-14 वर्षे, शिक्षण- 8वी 20) चि.मनिष हरिष बजरंगे, वय- 17 वर्ष
याप्रमाणे विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या पोलीस पाल्यांचा गौरव सोहळा कार्यक्रमावेळी बोलतांना मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. दत्तात्रय कराळे यांनी यशस्वी विदयार्थी तसेच त्यांचे पालक यांना अभिनंदन करुन भविष्यातील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमात मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक श्री, आशित कांबळे, पोलीस उपअधीक्षक (मुख्या) श्री. अनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार श्री. संजय महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा श्री. दत्ता पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा श्री. सुभाष भोये, एम.एस.ई.बी.चे अधिक्षक अभियंता श्री. दराडे, नगरपालीकेचे कार्यकारी अधिकारी, श्री. राहुल वाघ तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, त्याचप्रमाणे जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, कर्मचारी असे उपस्थित होते.
Tags:
शासकीय