विषय -- पावसाळा ऋतूतील सर्दी खोकला आणि ताप
सौ. शालिनी माटेगावकर. चिखलदरा. अहिल्यानगर.
संपूर्ण जगात दोन ऋतू असतात. हिवाळा आणि उन्हाळा. पण भारतात तीन ऋतू अस्तित्वात आहेत. त्यातील पावसाळा हा महत्त्वाचा ऋतू आहे. साधारणतः जुलै ते ऑक्टोबर पर्यंत हा ऋतू अस्तित्वात आहे . मराठी श्रावण महिन्यात सततचा पाऊस. थंडगार हवा. नवीन पाणी. ढगांमध्ये धुके पसरलेले. मातीत सतत चा ओलावा. वातावरणातील थंडी. जमिनीवर झाडाझुडपांच गवताची हिरवळ वातावरण.त्यामधे बंगालच्या उपसागरात हवेतील कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकण किनारपट्टी पासून मुंबई आणि मध्य महाराष्ट्र / उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी सदृष्य ढगफुटीमुळे अतोनात झालेला पाऊस . सगळीकडे जलमय परिस्थितीमुळे मानवी शरीराच्या अंगावर निर्माण होणारे सततचे आजार यामुळे घरोघर रोगराई पसरलेली. म्हणजे अशा परिस्थितीत आपणास सर्दी . खोकला . ताप. घशाचे प्रादुर्भाव. नाकातील एलर्जी सर्दी. डोळ्यांची झुळझुळ. डोकेदुखी. अंगदुखी. सांधेदुखी. एक नाकपुडी बंद. काना मध्ये ठणक .. सांधेदुखी. अंगातील कमी जास्त होणारा ताप अशी लक्षणे बऱ्याच व्यक्तींमध्ये जाणवतात.
लहान मुलांना शाळेत जाताना येताना डोक्यावर पाऊस लागला की पटकन सर्दी होऊन. खोकला. कफ. ब्रोंकायटिज. त्यापुढे कधी न्युमोनिया होऊ शकतो. कारण पावसाळ्यात दमट हवा समस्त असते. ढगाळ वातावरणात हवेतील ऑक्सिजन कमी होऊन श्वसन घेताना तो सहजरित्या घेतला जात नाही . म्हणून श्वास कष्ट होऊन अस्थमासारखे लक्षणे जाणवतात. हवेतील अनेक विषाणू आपल्या शरीराला नेहमी आजारपणाला पोषक होऊन आपली तब्येत बिघडते. कधी घशात खवखवते. घसा दुखतो. नाक चोंदते कधी एक नाकपुडी सर्दीमुळे बंद पडते. बाळासारखा द्रव सतत नाकातून बाहेर येतो. झोप लागत नाही. डोके ठणकते. सर्व अंग दुखतंय. ताप येतो. सर्दि तयार होऊन खोकला सुरू होतो. त्याला ब्राकायटीज म्हणतात पुढे तो दमा होऊन निमोनिया किंवा कोरोना सारखा विकार होऊन श्वास कष्ट होतात.
पावसाळी गार वातावरणामुळे सांधे दुखतात. सततच्या ओलसर जमिनीमुळे पायांना चिकल्या होतात. हाताच्या नखांमध्ये फंगल इन्फेक्शन होते. पावसाळ्यात सतत बाहेर कामानिमित्त फिरल्याने किंवा आंघोळी अगोदर कपडे वाळत नसल्याने ओलसर कपडे घातले तर आपणास त्वचा विकार होऊ शकतो. त्यामुळे सततची खाज येणे वचका येणे हे या दिवसात जास्त प्रमाणात होते . नदी नाल्यांच्या पाण्यात मातीचा काही अंश गेल्यानंतर पाणी अशुद्ध होते. अशुद्ध झालेले पाणी प्याल्यामुळे हगवण . पातळ जुलाब उलटी . डीहायड्रेशन होऊन कधी कॉलर होऊ शकतो. नवीन पाण्यामुळे कावीळ हेपटायटी हा विकार होत असतो
काही लहान बाळांची प्रतिकार क्षमता अशक्त असल्यामुळे त्यांना या दिवसात वारंवार सर्दी होणे खोकला येणे त्याचबरोबर तापाचं प्रमाण कमी जास्त होत असते. कधी कधी या दिवसात तापाची साथ येत असते. काही मुलामध्ये अनुवंशिकता असेल तर एलर्जी . टायफाईड .डेंग्यू . मलेरिया असे विकार होऊ शकतात. हवेतील गारव्यामुळे बऱ्याच स्त्रियांना सांधे दुखणे . कंबर दुखणे असे हाडांचे आजार होत असतात. कधीकधी आपण या दिवसात मसालेदार भाजी . हिरवी मिरची जास्त खाल्ली तर अपचन होणे . जुलाब होणे सुरू होते . कधीकधी आपण रात्री बेरात्री काही कामानिमित्त बाहेर पडले तर पावसाळ्यातील खड्ड्यांमध्ये गाडी अचानक गेल्याने कमरेचे त्रास कधी सांगताना पाय घसरणे.मुरगळणे. हातापायाची फॅक्चर होणे. असे त्रास बराच वेळा होतात. त्यामुळे लहान बाळापासून ते उतारवयापर्यंत सर्वांनी आपल्या तब्येतीकडे लक्ष ठेवावे. काही सर्वसाधारण पथ्य घेणे फार गरजेचे असते.
आपल्या फॅमिली डॉक्टर कडे बाळाला आजारपणा त गेल्यावर सर्व आजाराची लक्षणे चिन्हे.. कधीपासून आधार आहे. त्याची कारणे सुव्यवस्थेत सांगावी. त्यांना त्यांच्या त्याची प्रमाणे शरीराची तपासणी करू द्यावी. मग आपण झालेल्या आजाराचे निदान त्यांना विचारावे. कधीही डॉक्टरांना रोग निदान हे विचारावे. त्यामुळे आपण कोणते प्रिकॉशन घ्यावेत तेही विचारावे. दिलेली औषधे सुव्यवस्थेत कशी घ्यावी ? कधी घ्यावी ? हे सविस्तर विचारावे . जर आपणास बरे नाही वाटले तर पुन्हा डॉक्टरांकडे जाऊन सांगावे ? डॉक्टरांना प्रश्न विचारताना कधीही घाबरू नये ? बराच वेळा दवाखान्यात आपलाच काही गोष्टी सांगावयाची आठवण पडते. त्यामुळे घरून निघताना एका कागदावर मनातिल शंका ? कू शंका -- इतर लक्षणांची माहिती लिहून डॉक्टरांना दाखवावी.... म्हणजे झालेल्या रोगाचे निदान लवकर करून डॉक्टर आपणास परफेक्ट औषध लिहून देतात. आपण डॉक्टरांची योग्य ती फी देत असतो. त्यामुळे कधीही डॉक्टरांना घाबरू नये. ते आपल्या शरीरातील विकार हजार नष्ट करून आपणास रोगमुक्त करत असतात. त्यामुळे दवाखान्यात जाताना सर्व आजाराची माहिती सविस्तर सांगावी. ते आपले रोगमुक्त करणारे मित्र असतात.
पावसाळ्यातील सर्व साधारण पथ्य
१) पावसाळ्यात रोज पाणी गरम करून थंड करून प्यावे.
२) पाण्यात नेहमी ब्लिचिंग पावडर किंवा पोटॅशियम परमॅग्नेट टाकून किंवा तुरटी टाकून प्यावे.
३) जर कफ निर्माण होत असतील तर रोज रात्री झोपताना एक कप दुधात चिमूटभर हळद टाकून गरम करून प्यावे.
४) शक्यतो बाहेरील तळलेले पदार्थ किंवा सतत चिकन मटन हिरवी मिरची खाऊ नये.
५) आपणास किंवा लहान मुलांमध्ये सततची सर्दी खोकला होत असेल तर गरम पाण्यात मिक्स / पुदिना तुळस ओवा मिरे टाकून वाफ घ्यावी.
६) सकाळी चहा मध्ये सुंठ / आल टाकून प्यावे.
७) गार हवेत अर्थात पावसाळ्यात आईस्क्रीम. लिंबू . दही केळी .कढी.खाऊ नये .
८) स्वयंपाक करताना नेहमी पालेभाज्या गरम पाण्यात टाकून स्वच्छ धुवावी.
९) पावसाळ्यात घरी आल्यावर डोके ओले झाले असेल तर कोरडा रुमालाने साफ करून स्वच्छ कोरडे कपडे घालावे.
१०) अंघोळीनंतर अंगाला राईचे तेल किंवा मोहरीचे तेल लावावे.
११) शक्यतो पावसाळ्यात अति लांबचा प्रवास टाळावा.
१२) या दिवसात घरासमोरील डबकी. दुर्गंध पाण्याचा साठा कधी करू नये. घरातील किंवा घरावरती पाण्याची टाकी स्वच्छ करून त्यात तुरटी किंवा पोटॅशियम टाकावे.
१३) घराच्या परिसरातील अडगळीच्या ठिकाणी कधीही जाऊ नये कारण त्या ठिकाणी नेहमी अंधार असतो त्यात कचरा सर्प विंचू असे नेहमी तयार होतात . बूट . सॅंडल नेहमी परिधान करताना झटकून घ्यावेत.
१४) पाऊस सुरू असताना अचानक ढगांचा आवाज विजांचा कडकडाट होताना कधीही शेतात बांधावरती झाडाखाली उभे राहू नये किंवा लाईटच्या खांबाजवळ स्पर्श करू नये.
१५) घराच्या बाहेर पडताना सतत छत्रीचा वापर करावा किंवा अंगावर रेनकोट असू द्यावा त्यामुळे आपला संरक्षण मिळते.
१६) या दिवसात शक्यतो साधी खिचडी. वरण-भात. वरण बट्टी. खिर पोळी. गंगा फळ भाजी. हिरवी पालक भाजी. मुगडाळ .मठदाळ .उडीद डाळ . मसूर डाळ. गोड पदार्थ दूध अंडी रान भाजी यांचे सेवन जास्त करावे.
शक्यतो लहान बाळांना शाळेत जाताना जेवणाच्या डब्यात साधी खिचडी. मुगडाळ पोळी. साधे पिके पोहे. असे पदार्थ देऊन सोबत पाण्याची बाटली द्यावी.
झोपताना फॅन खाली झोपू नये. त्यांना कधीही जोराने रागवू नये. शाळेतून आल्यावर त्यांच्या पाठीवरुन खाली पाच वेळा आपली हाताची पाची बोटं यांनी स्पर्श करावा. अभ्यास घेताना कधीही मोठ्याने रागवू नये . त्यामुळे त्यांना एक प्रकारे भीती. मनावर दडपण येते किंवा फोबिया नावाचा आजार निर्माण होतो. त्यामुळे मुलं घाबरतात. झोपेत दचकतात. एखाद्या परक्या व्यक्तीशी कमी बोलतात.
आपण डॉक्टर कडे गेल्यावर त्यांची परिपूर्ण तपासणी झाल्यावर निदान रोगाचे विचारावे. त्याची कारणे विचारावेत
रोग होऊ नये यासाठी कोणते प्रिकॉशन घ्यावे ? हे पण विचारावे. कारण आपण डॉक्टरांना त्यांचा योग्य मोबदला ( फी ) देतो. त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीचा डॉक्टरांना शंका समाधान विचारण्याचा अधिकार असतो. आपणास कोणता विकार आजार झाला आहे. त्याची कारणे. आणि उपाय हे सतत विचारू शकतात.
घरात काही औषध नियमित ठेवावीत
आजीबाईचा बटवा - या प्लास्टिकच्या डब्यात आपण सर्वसाधारण काही औषध नियमित ठेवू शकतो ?
१ ते १० वयवर्ष बाळांसाठी
१) अचानक आलेला ताप - Sy.Calpol / Sy.Paracitamol / Sy.Ibugesic +
२) सर्दी. एलर्जी - Sy. Cetrizin.
३) कफ.खोकला - Sy . Kufril D
Expecto. piritone
४) जुलाब .पातळ संडास - Saspen. O 2
५) उलटी बंद - Sy. Perinorm.
Sy.Vomitab.
१० ते पुढील वयवर्षापूढे.
थोड्याफार निदानाप्रमाणे खालील औषध आपल्या घरात सर्वसाधारण इमर्जन्सी वेळेस रात्री बे रात्री घेऊ शकतो
१) Tab Ibugesic Pluse --- अंग दुखणे.ताप.डोक.कंबर दुखणे.
२) Tab Zintec -- असिडिटी. छातीत जळजळ. छातीत आग होणं..
३) पातळ जुलाब . हगवण - Tab O2
४) प्रवासात बस लागणे. उलटी मळमळ होणे.--- Tab Stemetil. / Perinorm / Avomin
५) Tab Gelusil MPS --ऍसिडिटी .छातीत जळजळ.
याव्यतिरिक्त जास्त त्रास असेल तर आपल्या फॅमिली फॅशन डॉक्टरांकडून तपासून घेणे आवश्यक असते?
Tags:
आरोग्य