श्री गणेशोत्सवात शांतता बाधित राहण्यासाठी नवापूर शहरात पोलिस पथसचलन..

      नवापूर - सत्यप्रकाश न्युज 
    शहरात आगामी येणाऱ्या श्री गणशोत्सव व विविध सणासाठि शहरासह परिसरात शांतता अबाधित राहण्यासाठी व कोणताहि अनुचित प्रकार न घडण्यासाठि नवापूर पोलीस स्थानकातर्फे शहरात पथसचलन करण्यात आले.
     पोलीस नारिक्षक अभिषेक पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या पथसचनाला पोलीस स्टेशन पासून सुरवात करण्यात आली शास्रीनगर, नारायणपूर रोड, मच्छी बाजार, लिमडावाडी, लाईट बाजार, डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या पुतळ्या पासून पोलीस स्टेशन मध्ये सागता करण्यात आली.
     या पथसचलनात पोलीस निरिक्षक अभिषेक पाटील सह नवापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच गृह रक्षक दलातील पुरुष व महिला कर्मचारी सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post