मुंबई सत्यप्रकाश न्युज
अंशतः अनुदानित शाळांचा 970 कोटी रुपये अनुदान शासन आदेश अजून निघत नाही म्हणून कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर व माजी शिक्षक आमदार श्री श्रीकांतजी देशपांडे साहेब यांनी उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेतली, तात्काल जीआर काढण्यासंदर्भात शिक्षण सचिव रणजितसिंह देओल साहेब यांना आदेश द्यावे अशी विनंती केली, त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी, शालेय शिक्षण सचिव श्री रणजीत सिंह देओल साहेब यांना साहेबांनी स्वतः फोन लावला व तात्काळ जीआर काढा असा आदेश दिला. सोमवारी जीआर प्रकाशित होईल असे शिक्षण सचिवांनी मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना सांगितलं.
Tags:
शैक्षणिक