नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणेश मंडळाच्या अध्यक्षांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात यावा महाराष्ट्र कला अकॅडमी मुंबई यांच्याकडून उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा तसेच अन्य उपक्रमांना मान्यता देण्याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. सदर परिपत्रकाच्या अनुषंगाने तालुकास्तरीय उत्कृष्ट गणेश मंडळांची निवड करण्यात येणार असून त्यांना प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे पारितोषित देण्यात येणार आहे. तरी सर्व मंडळांनी सदर स्पर्धेत भाग घेण्याकरिता दिलेल्या अटीचे पालन करावे व स्पर्धेत भाग घेण्याकरिता ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे. जा मंडळांनी अद्याप पावेतो नगरपालिकेची/पोलीस प्रशासनची परवानगी घेतली नसेल त्यांनी तात्कान्ळ प्रक्रिया पूर्ण करावी..*(ज्या मंडळांनी नगरपालिकेची परवानगी न घेता यापूर्वी नवापूर पोलीस स्टेशन येथे फॉर्म जमा केले आहेत त्यांनी आजच नगरपालिकेची परवानगी पत्र पोलीस स्टेशन येथे जमा करण्याचे आवाहन अभिषेक पाटील पोलीस निरीक्षक,नवापूर पोलीस ठाणे यांनी केले आहे.
Tags:
धार्मिक