शहरासह परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव आता नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू लागला आहे. दिवसा अचानक वीज पुरवठा खंडित होणे, रात्री उशिरा देखभाल कामांच्या कारणावरून पुरवठा बंद ठेवणे, तसेच कोणत्याही प्रकारची आगाऊ सूचना न देणे यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सततच्या विजेच्या या अघोषित लोडशेडिंगमुळे घरगुती उपकरणे नादुरुस्त होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. सोशल मीडियावरही जागृत ग्राहकांनी थेट सवाल केला आहे की, "दिवसा ग्राहकांच्या तक्रारी टाळण्यासाठी वीज बंद ठेवली जाते, पण रात्री कोणते असे काम असते ज्यासाठी पुरवठा बंद करावा लागतो?" तो देखील पूर्व सुचना न देता
याबाबत नुकत्याच झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीतही सदस्यांनी वीज पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले. नियमावली असताना तिची अंमलबजावणी न करता गोलमाल उत्तर देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप सुज्ञ ग्राहकांकडून करण्यात येत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावर आला असताना अशा प्रकारचा विजेचा लपंडाव सुरू राहिला तर नागरिक रस्त्यावर उतरून मोठ्या आंदोलनाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने तातडीने सुधारणा करावी, पुरवठा सुरळीत करावा आणि आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
वीज पुरवठा खंडित करण्याची नियमावली आपत्कालीन दुरुस्ती किंवा देखभाल कामासाठी वीज खंडित करायची असल्यास ग्राहकांना किमान 24 तास आधी सूचना देणे बंधनकारक आहे., अघोषित लोडशेडिंग टाळणे ही वितरण कंपनीची जबाबदारी आहे., नियोजित लोडशेडिंगसाठी निश्चित वेळापत्रक प्रसिद्ध करणे आवश्यक असते., वारंवार वीजपुरवठा खंडित केल्याने ग्राहकांचे नुकसान झाल्यास त्याबाबत भरपाईची तरतूद करावी लागणार आहे
आश्वासन हवेत विरले..!
नवापूर शहरात नुकत्याच झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत वीज वितरण कंपनीकडून नागरिकांना आश्वासन देण्यात आले होते की शहराचा वीज पुरवठा सुरळीत ठेवला जाईल, अनावश्यक खंडित केला जाणार नाही." मात्र प्रत्यक्षात हे आश्वासन केवळ कागदोपत्री ठरले. शहरात दररोज विजेचा लपंडाव सुरूच असून नागरिक त्रस्त झाले आहेत, तर संताप व्यक्त होत आहे. आता गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सणाच्या दिवसांत वीज सुरळीत राहील का..?" हा सवाल नवापूरकरांकडून जोरदार उपस्थित केला जात आहे.
महावितरतचा फोन विजेवर चालतो का?
एक विशेष म्हणजे दिवसा किंवा रात्री अपरात्री जेव्हा हि विज पुरवठा खडित होतो त्या सोबतच महावितरण कार्यलयाचा दुरध्वनी देखील बद होतो महावितरण कार्यालयाचा फोन विजेवर चालतो का? असा सवाल नागरिकांना पडला आहे फोन नियमित सुरू राहिल व तो रिसीव्ह होईल याची देखील सोय करण्याची मागणी वीजग्राहकाकडुन होत आहे.
Tags:
सामाजिक