कृषि औजारे बँक स्थापना करण्यासाठी अर्ज सादर करावे---------

नंदुरबार, दि.14  (जिमाका वृत्तसेवा) :
   कृषि विभागामार्फत सन 2021-2022 करिता कृषि कल्याण अभियान-3 मोहिमेंतर्गत आकांक्षित जिल्ह्याकरिता कृषि यांत्रिकीकरण उपअभियानातंर्गत भाडे तत्वावर कृषि यांत्रिकीकरण सेवा सुविधा देण्यासाठी कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठी 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृ्षी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.
   शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे नोंदणीकृत गट, नोंदणीकृत शेतकरी बचत गट, विविध कार्यकारी संस्थांना कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठी 10 लाख रुपये खर्चाची मर्यादा असून त्याकरिता 80 टक्के किंवा अनुदानाची उच्चत्तम मर्यादा रु. 8 लाख यापैकी जी कमी असेल त्या मर्यादेत अनुदान डीबीटी प्रणालीद्वारे गटास देण्यात येईल. या योजनेनुसार प्रति तालुका 2 औजारे बँक स्थापन करण्याचा लक्षांक आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी व  विहीत नमुन्यातील अर्जासाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी  तसेच कृषि विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विहीत नमुन्यातील भरलेले अर्ज संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
0000

Post a Comment

Previous Post Next Post