भारताची गानकोकिळा स्वर्गिय लता दीदींना शिंपी समाजतर्फे भावपूर्ण गूगलमिट द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली!!------------------भारतरत्न, स्वर कोकीला पद्मभूषण लतादीदींचे शिंपी समाजाशी रक्ताचे नाते-- निर्मलाताई शिंपी यांचे प्रतिपादन.

कल्याण (मनिलाल शिंपी)
 रविवारी सायंकाळी ५ वाजता. आँनलाईन गुगल मीटवर भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण,गानसरस्वती सुरसम्राज्ञी आदरणीय स्वरगान कोकीला स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांचा श्रद्धांजलीचां कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
आजचा कार्यक्रम आयोजित करण्याचा हेतु, शिंपी समाजा च्या गृप वर सौ.निर्मलाताईंनी लतादीदीं च्या विषयी रक्ताचे  नाते हा लेख पाठवला होता.ते वाचुन मला आठवले                ५-२-२००० साली पहिल्या महिला संमेलनात माझी मुलगी दिपाली ब्राम्हणकर हिला समाज भूषण पुरस्कार  मिळाला होता* *त्यावेळेस निर्मलाताईंचा पण सत्कार झाला होता त्या कार्यक्रमाचे मी सर्व फोटो काढले होते.मी निर्मला ताईशी संपर्क करून त्यांना गृप वर अॅड केले.त्यांची आमची खुप छान चर्चा झाली आणि सर्व महिलांना पण ताईंना भेटण्याची इच्छा झाली. म्हणुन हा आँनलाईन श्रध्दांजलीचां कार्यक्रम आयोजित केला.
निर्मला ताईनी मग लता दीदींचीं सविस्तर माहिती सांगितली शिंपी समाज व लता दीदीं चे नाते म्हणज्ये अभिमाना स्पद बाब हे एक अनमोल नाते आहे. कारण शिपीं समाजा सोबत त्यांच्या आई म्हणजेच माई मंगेशकर* *यांच्या कडुन नाळ  जोडली  गेली आहे माई मंगेशकर व आपले समाजा चे नाते काय? निर्मलाताई नी सांगितले की माझ्या मातोश्री श्रीमती सीताबाई माधवराव बागुल राहणार मुल्हेर ह्या व लता दीदींच्या मातोश्री श्रीमती शेवंताबाई (माहेरचे नांव) ह्या दोघी संख्या मावस बहीणी.माईच्या आईचे सासर खान्देश पण साधारण परिस्थिती मुळे अथवा शिक्षणा साठी शेवंता बाई व सोन्याबाई ह्या बहीणी आजोळी म्हणज्येच थाळनेर येथे त्यांचे मामा (दामुमामा) दामोदर कापुरे यांच्याकडे रहायच्या व आदरणीय दिनानाथ मंगेशकर यांचे संगीत नाट्य पथक असल्याने  नेहमीच गावोगावी भ्रमंती असायची व अश्याच प्रकारे थाळनेर येथे माई व त्यांची भेट झाली व लग्नात रूपांतर झाले.पण पुर्वी जुन्या रुढी व इभ्रत जपायचे त्यामुळे हे लग्न समाजाला आवडले पटले   नाही व समाजाने त्यांचे घर वाळीत टाकले. त्यांनतंर मात्र खुप खडतर प्रवास सुरू झाला पण  समाजाने ढुंकूनही पाहिले नाही.नतंर लतादीदीं च्या कलागुणांनी त्यांचे दिवस पालटले.मगमात्र काही लोभी नातेवाईक नातं सांगुन भेटण्या ची गर्दी करू लागले पण  परीणाम काय?अंती त्यांच्या कडुन प्रतीसाद मिळाला नाही(सहाजिकच आहे) त्यांच्या खालावलेल्या परीस्थितीत कुणी मदतीचा हात दिला असता तर चित्र समाजाला वेगळेच दिसले असते. मात्र दिदी दामु मामाचीं आजोळी भेट घ्यायच्या.दामु मामा वृध्द झाले तेव्हां त्यांचे वास्तव्य मुल्हेर येथे होते ते मात्र नेहमी लता दीदीं कडे जायचे. त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन सुध्दा लता दिदीने मुंबईत केले होते अश्या आठवणी
निर्मला ताई  शिंपी यांनी सांगीतली.
त्यांनंतर उपस्थित असलेले अहिर शिंपी समाजाचे विश्वस्त व सर्व जमलेल्या पदाधिकारी यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली त्या नतंर उपस्थित झालेले सर्व शिंपी समाजाचे  विश्वस्त व पदाधिकारी यांनी लता दीदींनां श्रद्धांजली वाहिली श्री.दादासाहेब डी.व्ही बिरारी.अ.भा.अहीर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था माजी अध्यक्ष.विश्वस्त.
श्री.विजय नाना बिरारी. अ.भा.शिपी समाज माजी अध्यक्ष .विश्वस्त.श्री बापुसाहेब नरेंद्र भामरे अ.भा.शिपी समाज माजी अध्यक्ष.विश्वस्त श्री भाऊसाहेब गोपाळ राव शिंपी अ.भा.शिपी  समाज माजी अध्यक्ष विश्वस्त.
श्री.मोहनलालजी छिपा  अ.भा.नामदेव छीपासमाज  महासभा राष्ट्रीय अध्यक्ष.*
श्री.मनीलाल भाऊ शिंपी. आर एस.पी.युनीट कमांडर राजेन्द्रभाऊ शिंपी वाडीकर साहेब
ऊषाताई पोरे (नामदेव परीषद महिला अध्यक्ष)आशा चोसाळकर. नामदेव महिला परीषद अरुणाताई विजय बिरारी महिला आघाडी संघटक.विद्दुलता जळगावकर.महिलाआघाडीऊपाध्यक्ष.सुनीता ताई शिंपी. नाशिक जिल्हा अध्यक्ष.सौ.विद्याताई बागुल. म.का.सदस्य
सुनीताताई मनोहर बाविस्कर मकार्यकारणी सदस्य.प्रतिभा दीपक बिरारी.लक्ष्मी धवल एकता महीला मंडळ सिडको ना.अध्यक्षा.सौ मेघा नंदकुमारबागुल.नाशिक जिल्हाउपाध्यक्ष.विद्याताई बागुल.म.का. सदस्य,रजनी गोपाल खैरनार.म.का सदस्य. राजश्री सोनवणे, सुरेखा सोनवणे, वंदनाताई मेटकर,सौ.दिपाली संदिप माडंगे.(ब्राम्हणकर) यांनी वेबिनार कार्यक्रमां साठी संपुर्ण सहकार्य केले.ह्या संपूर्ण आर्द्रतेचे,सुत्रसंचलन,आभार श्रीमती सुमनताई ब्राम्हणकर.अ.भा.अहिर शिपी समाज मध्यवर्ती संस्था माजी महीला अध्यक्ष जेष्ठ मार्गदर्शक.
अ.भा.क्षत्रीय नामदेव महासंघ दिल्ली कौन्सीलर.महिला सुरक्षा संघटन व्हाइस प्रेसीडेन्टं पुणे यांनी केले.



Post a Comment

Previous Post Next Post